हातनूरचे वारकरी’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी निवड

हातनूरचे वारकरी’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी निवड
Published on
‘हातनूरचे वारकरी’ची आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : हतनूर धरण जलाशयाची समृद्ध पक्षीविविधता व सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे मांडणाऱ्या (हातनूरचे वारकरी) या लघुपटाची पाचव्या इंटरनॅशनल टूरीझम फिल्म फेस्टीव्हल २०२६साठी निवड झाली आहे. पुणे येथे येत्या २६ व २७ सप्टेंबरदरम्यान हा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव होणार आहे. पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांच्या संकल्पनेतून हा लघुपट साकारला आहे. त्याच्या निर्मितीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे सहकार्य लाभले. हातनूर धरण परिसरातील जैवविविधता, विविध पक्षीप्रजातींचे अधिवास, पक्षीनिरीक्षण व या परिसराशी जोडलेली सांस्कृतिक परंपरा यांचे प्रभावी चित्रण लघुपटातून करण्यात आले आहे. लघुपटाचे दिग्दर्शन पुणे येथील अरविंद जोशी यांनी केले आहे. विशेष गांधी यांनी चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळली. निर्मितीप्रक्रियेत सत्यपालसिंग राजपूत, सौरभ महाजन, समीर नेवे, पीयूष महाजन, राजपालसिंग राजपूत, उदय चौधरी यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. हतनूर जलाशय हा स्थलांतरित, स्थानिक पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अधिवास मानला जातो. या परिसरातील पक्षीविविधता व त्यामागील निसर्गसंपदा व्यापकस्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न या लघुपटातून करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी झालेली निवड ही हतनूरच्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाला मिळालेली महत्त्वाची दखल मानली जात आहे. हतनूर परिसरातील निसर्ग, पक्षी व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कार्यरत चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या प्रयत्नांना या निवडीमुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. या यशाबद्दल संबंधितांकडून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com