धुळे टुडे ३ संक्षीप्त

धुळे टुडे ३ संक्षीप्त
Published on
धुळे ः टुडे ३ साठी, संक्षीप्त -- दोन गट भिडले; आठ जणांवर गुन्हा धुळे : शेवाळी (ता. साक्री) फाट्यावर कौटुंबिक वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना सहा सप्टेंबरला सकाळी घडली. दोन्ही बाजूंकडून हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. त्यावरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. कैलास वाघमोडे (रा. कळंभीर, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार शेवाळी फाट्यावरील पेट्रोलपंपासमोर त्यांनी अनिल गोयकर, सुनील गोयकर, गणेश गोयकर व अंबर खताळ (सर्व रा. भदाणे) यांना ‘तुझ्या बहिणीस माहेरून घेऊन जा’, असे सांगितले. या बोलण्याचा राग आल्याने चौघांनी वाघमोडे यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यावर वस्तूने प्रहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुसऱ्या बाजूने अनिल भीमराव गोयकर (रा. नवे भदाणे, ता. धुळे) यांच्या फिर्यादीनुसार कौटुंबिक कारणावरून कैलास वाघमोडे, भटू खताळ, रत्नाबाई खताळ व रोहिदास सरगर (सर्व रा. नवे भदाणे, ता. धुळे) यांनी अनिल गोयकर व त्यांच्या भावाला काठीने व हाताबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. दोन्ही फिर्यादींवरून संबंधित आठ जणांविरोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. - मुलीचे अपहरण; पाच जणांवर गुन्हा धुळे : विरदेल (ता. शिंदखेडा) येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गुजरातमधील सुरत येथे लपवून ठेवल्याचा आरोप करत पाच संशयितांवर शिंदखेडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. रियाज मुस्तकीम फकिर, जरीना मुस्तकीम फकिर, मुस्तकीम बादशाहा फकिर, तमन्ना फकिर (सर्व रा. विरदेल, ता. शिंदखेडा) तसेच तमन्ना फकिर हिचा पती (रा. सुरत, गुजरात), अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारीनुसार एक ऑगस्ट ते पाच सप्टेंबरदरम्यान रियाज फकिर याने आई, वडील, बहीण व मेहुण्याच्या मदतीने तक्रारदाराच्या मुलीला पळवून नेले. त्यानंतर तिला सुरत येथे लपवून ठेवल्याचा आरोप आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. - गोमांस वाहतूक; रिक्षावर कारवाई धुळे : पिंपळनेर-नवापूर (ता. साक्री) रस्त्यावरील प्रतिवार्सा नाक्याजवळ विक्रीच्या उद्देशाने गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षावर पिंपळनेर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ८० किलो गोमांस व रिक्षा, असा एकूण ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित मनोहर दगा वेंदे (रा. वार्सा, ता. साक्री) व इम्रान भिकन पठाण (रा. चिंचपाडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सहा सप्टेंबरला सकाळी पावणेदहाच्या सुमारास पिंपळनेर पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रतिवार्सा नाका परिसरात गस्तीवर असताना संशयास्पद रिक्षा (जीजे ०७ टीटी १३३५) आढळली. पोलिसांनी रिक्षा थांबवून पाहणी केली असता त्यात विक्रीसाठी नेले जाणारे ८० किलो गोमांस आढळले. पोलिसांनी एकूण ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कर्मचारी कैलास कोळी यांच्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. - विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू धुळे : काशीपूर (ता. साक्री) येथील कृष्णा बापू मारनर (वय ३१) या तरुणाचा शेतातील विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. सहा सप्टेंबरला सकाळी नऊच्या सुमारास काशीपूर शिवारातील शेतातील विहिरीत कृष्णा मारनर तरंगताना आढळला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी त्याला विहिरीबाहेर काढून उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. - शेतालगत विहिरीत आढळला मृतदेह धुळे : सुलवाडे (ता. शिंदखेडा) शिवारातील शेतालगतच्या विहिरीत देवनाथ तानाजी मोरे (वय ३५) यांचा मृतदेह आढळला. विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. - पांझरा नदीकाठ; दुचाकीची चोरी धुळे : शहरातील देवपूर परिसरातील पांझरा नदीकाठावरून उमेश आनंदा मरसाळे (रा. नवजीवननगर, फाशीपूल चौक, चितोड रोड, धुळे) यांची दुचाकी (एमएच १८ सीसी ०५५९) चोरट्याने नेली. ही घटना पाच सप्टेंबरच्या रात्री घडली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com