फोटो - NSK26H29485
नाशिक : ग्लोबल व्हीजन स्कूलच्या वर्धापनदिनप्रसंगी शशांक मणेरीकर, विजयालक्ष्मी मणेरीकर आदी.
ग्लोबल व्हीजन स्कूलचा
सोळावा वर्धापनदिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : अंबड येथील ग्लोबल व्हीजन स्कूलमध्ये शाळेच्या १६ वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा गौरव करणारा फाउंडर्स डे तसेच शाळेचे सचिव शशांक मणेरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक (वित्त) वरिंदर कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव शशांक मणेरीकर, संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर, शैलजा मणेरीकर, पंडित शंकरराव वैरागकर, सुज्ञान वैरागकर, माजी नगरसेविका मंदाताई दातीर, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स लि.,चे संचालक देवेंद्र राणे, कृष्णा सोलर सर्व्हिसचे विनायक पाटील, स्नेहा पाटील, भरत प्रजापती, संग्राम साठे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा क्रेडिट मॅनेजर संभाजी सुसे, रोटेरियन शिल्पा पारिख, रोटेरियन वैशाली रावत, प्राचार्य चंद्रकांत कुलकर्णी तसेच प्री-स्कूल प्रमुख श्रीमती सुषमा आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेल्या परसबागेतील विविध पिके व भाजीपाल्याची पाहणी करून मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी संगीत व नृत्याचे आकर्षक सादरीकरण केले. दहावीतील कु. मनाली चौधरी व कु. आश्लेषा अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमादरम्यान रोटरी इन्स्टॉलेशन सोहळाही उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे वरिंदर कुमार, शशांक मणेरीकर आणि विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी मनोगत व्यक्त केले. उल्हास बच्छाव यांनी आभार मानले.