नाशिक शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

नाशिक शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर
Published on
नाशिक शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर ज्येष्ठ व तरुणांचा मेळ; संघटनात्मक बांधणीवर भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : शहर-जिल्हा काँग्रेसची नवी जम्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने व प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष व संघटक प्रशासन ॲड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने ही यादी प्रसिद्ध केली आहे. या कार्यकारिणीत ज्‍येष्ठ व तरुण पदाधिकाऱ्यांचा मेळ घालण्यात आला असून, संघटनात्‍मक बांधणीवर भर दिला आहे. नव्या कार्यकारिणीत सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व देत अनुभवी नेते आणि आक्रमक तरुण कार्यकर्त्यांचा समतोल साधला आहे. शहर काँग्रेसच्या संघटनात्मक विस्तारासाठी उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, संघटक सचिव आणि समन्वयक पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ही नवी फळी शहरात जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून पक्षाला नवी ऊर्जा मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे व दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांनी अभिनंदन केले. --- नूतन कार्यकारिणी अशी ः उपाध्यक्ष : सुफियान कोकणी, रमेश जाधव, उद्धव पवार, सुनील महंकाळे, अनिल कोठुळे, संदीप शर्मा. कोशाध्यक्ष : शशिकांत शिंदे सरचिटणीस : विजय पाटील, माणिक जायभावे, अरुण दोंदे, रामू शिंदे, सुधीर बोडखे, कैलास कडलग, साजीद खान, गणेश भोरे, विक्रम वावरे, वृंदा शेरे, कैलास महाले, कुसुम चव्हाण, युनूस शेख, योगेश गांगुर्डे, रौफ कोकणी, शिवाजी भंदुरे, भालचंद्र पाटील. सचिव : दत्ता सोनवणे, मुस्ताक कुरेशी, सॅम्युअल भौताडे, धोंडिराम बोडके, देवराम सैंदाणे, संतोष कस्तुरे, मुस्ताक शेख, सागर खिवंसरा, संतू पाटील जायभावे, इसाक कुरेशी, जयवंत धुमने, फारूक कुरेशी, दीपक राव, मामूलाला जाधव, कमिल इनामदार, शैलेश माने, संजय पवार संघटक सचिव : मीरा साबळे, सोमनाथ मोहिते, अनिल बोहोत, किरण लोखंडे, जगदीश बोडखे, ॲड. कीर्ती राठोड, विश्वास मोराडे, कांतिलाल जयस्वाल समन्वयक : उल्हास सातभाई ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com