पोलीस आयुक्तालयातर्फे गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा

पोलीस आयुक्तालयातर्फे गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा
Published on
पोलिस आयुक्तालयातर्फे गणेश मंडळांसाठी स्पर्धा पर्यावरण, सामाजिक देखाव्यांसह शिस्तीची नियमावली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : शहर पोलिस आयुक्तालयातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात स्थानिक पोलिसांची रीतसर परवानगी घेतलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पारितोषिक योजना २०२६ जाहीर करण्यात आली आहे. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या उत्सवात कायदा, सुव्यवस्था व सामाजिक शिस्त पाळणाऱ्या मंडळांना विशेष पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. आयुक्तालय हद्दीतील परवानगी घेतलेल्या मंडळांना यात सहभाग नोंदविता येणार असून, परिमंडळ एक व दोन अंतर्गत प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ दोन पारितोषिक उत्कृष्ठ मंडळांना दिले जाणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक मंडळांना निकषांप्रमाणे गुण परीक्षकांकडून दिले जातील. यात गणेशोत्सवातील देखावे, पर्यावरणपुरकता, सामाजिकता, महिला सुरक्षितता तर विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन या आधारे मंडळांना गुण दिले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी https://nashikcitypolice.gov.in/GanapatiAwardForm या अधिकृत लिंकवर जाऊन येत्या १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री ११:५९ पर्यंत आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. नाशिक शहरातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. ....​ श्री स्थापना ते विसर्जनपूर्व कालावधी -​पर्यावरणपूरक सजावट व व्यवस्था : पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट आणि मंडप सुरक्षितता सुरक्षा व सुविधा : मंडपाची साईज, सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक मर्यादा, वीज खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था आणि भाविकांसाठी स्वतंत्र रांगेची सोय -​सामाजिक उपक्रम : पाणी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान शिबिर, गडकिल्ले संवर्धन, आरोग्य सेवा आणि सामाजिक सलोखा वाढवणारे देखावे -​जनजागृती मोहीम : महिला व बालक सुरक्षा, ''डायल ११२'' हेल्पलाइनबाबत जागरूकता, अमली पदार्थ विरोधी मोहीम .... विसर्जन मिरवणूक -​वाहने व मूर्तीची सुरक्षितता : विसर्जन वाहनाची व्यवस्था, सुरक्षित आसन आणि वाहतूक शिस्त पारंपरिक वाद्ये व शांतता : ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांची शिस्त, नियंत्रित गुलाल वापर आणि विसर्जन मार्गावरील संवेदनशील ठिकाणी पाळलेली शिस्त -​वेळेचे नियोजन व स्वयंसेवक : मिरवणुकीत पडणारा खंड टाळणे, दोन मंडळांमध्ये अंतर राहू न देणे आणि वेळेचे काटेकोर पालन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com