ॲंकर
शहर-जिल्हा (कॉमन) टुडे पान चारसाठी
----------
फोटो मोठा घ्यावा
NSK26H29488
पाचोरा : येथील नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘सकाळ-एनआयई’च्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटपप्रसंगी आमदार किशोर पाटील, नगरसेवक सुमित पाटील, ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे वितरण व्यवस्थापक राकेश पाटील, प्राचार्या राधिका प्रभू आदी.
-------
नर्मदा स्कूल ऑफ एक्सलन्सचा अनोखा पुढाकार!
------
‘सकाळ-एनआयई’चा उपक्रम; आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते स्कूल बॅगचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा नर्मदा स्कूल ऑफ एक्सलन्सचे संस्थापक किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून पाचोरा येथील साकारलेल्या नर्मदा स्कूल ऑफ एक्सलन्स येथे ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘एनआयई’ हा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. संपूर्ण खर्च संस्थेच्या वतीने केला जाणार आहे.
‘वाचनातून ज्ञान, ज्ञानातून सक्षम नागरिक’ विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांची वाचनसंस्कृती समृद्ध व्हावी, चालू घडामोडींचे ज्ञान वाढावे, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेला पाया भक्कम व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रमांसाठी शुल्क आकारले जात असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत आमदार किशोर पाटील यांनी ‘सकाळ एनआयई’ उपक्रम पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातच नियमितपणे ‘एनआयई’ वर्तमानपत्र वाचण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
या उपक्रमांतर्गत शाळेत एनआयई स्कूल बॅग वाटप कार्यक्रम पार पडला. आमदार पाटील व नगरसेवक सुमित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना मोफत वर्तमानपत्र उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम वाचनसंस्कृतीला निश्चितच चालना देणारा ठरणार आहे. यावेळी प्राचार्या राधिका प्रभू, उपप्राचार्य जोमन जॉन, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, जनसंपर्क अधिकारी समाधान पवार, स्वीय सहायक राजेंद्र पाटील, ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे वितरण व्यवस्थापक राकेश पाटील, वितरण प्रतिनिधी इस्राईल पठाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.