टुडे पान चारसाठी
(शहर-जिल्हा कॉमन घ्यावी)
NSK26H29494
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आविष्कार स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन करताना कुलगुरु प्रा. विजय माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, ‘आविष्कार’च्या समन्वयक प्रा. डॉ. सुरेखा पालवे, राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदी.
----------------
‘आविष्कार’ स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, संशोधनवृत्तीला व नवकल्पनांना मंच उपलब्ध करून देणारी बहुप्रतिक्षित ‘आविष्कार’ स्पर्धा यंदादेखील होत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने धुळे, जळगाव व नंदुरबार या तीनही जिल्ह्यांत जिल्हास्तरीय व विद्यापीठ परिसरात स्वतंत्र आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन नुकतेच झाले.
जिल्हास्तरीय व विद्यापीठ परिसरात आयोजित स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, ‘आविष्कार’च्या समन्वयक प्रा. सुरेखा पालवे, विद्यार्थी विकास अधिकारी, अधिसभा सदस्य अमोल मराठे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रवीण महाले, ‘आविष्कार’च्या सहसमन्वयक प्रा. अमरदीप पाटील उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्याची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा आठ ऑक्टोबरला मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणार आहे.
धुळे जिल्ह्याची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा पाच ऑक्टोबरला शिरपूर येथील एस. पी. डी. एम. महाविद्यालयात व नंदुरबार जिल्ह्याची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा पाच ऑक्टोबरला नवापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होईल. त्यानंतर नऊ ऑक्टोबरला विद्यापीठ परिसरात विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा होईल.
आविष्कार स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची सहभाग नोंदणी ११ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. २५ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची अंतिम तारीख आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत नोंदणी करून या ज्ञान व संशोधनाच्या पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.