सेकंडमेन
शहर टुडे पान चारसाठी
NSK26H29497
------------
नवीपेठेत अवतरणार जगन्नाथ पुरीची आरास
---
श्रीगणेश आगमनानिमित्त आज शहरातून रथयात्रेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीपेठ गणेश मंडळातर्फे यंदाच्या वर्षी जगन्नाथ पुरीची आरास साकारली जात आहे. मंडळाचे गणेश उत्सवाचे हे ५३वे वर्ष आहे. यापूर्वीदेखील धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक विषयांवर केलेल्या प्रबोधनात्मक आरास वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.
मंडळातर्फे श्रीगणेश उत्सव, दहीहंडी उत्सव, दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवी पेठ गणेश मंडळ संचलित नाव लौकीक प्राप्त युवा गर्जना अव्यावसायिक ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांपासून विविध वाद्यांनी सुसज्ज अशा दर्जेदार ढोल-ताशा वादन पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यात युवा-युवतींचा सक्रीय सहभाग मोठ्या संख्येने असून, सादरीकरणातील ताल ठेक्याने प्रत्येकाचे चित्त वेधले जाते.
गणेशोत्सवात नवी पेठ गणेश मंडळाचे वतीने यंदाच्या वर्षी भगवान श्री जगन्नाथ मंदिर (जगन्नाथ पुरी), इस्कॉन संबंधित भव्य आरास सादर केली जात आहे. रोज भगवान श्री जगन्नाथ यांची विशेष पूजा अर्चना शास्त्रोक्त वेदमंत्रांनी येथे केली जाणार आहे. दिवसभरातून एकूण पाच वेळा नैवद्य अर्पण केला जाणार आहे. भगवान श्री जगन्नाथ यांना ५६ भोग नैवद्य अर्पण कार्यक्रमदेखील केला जाणार आहे.
शहरातून शााेभायात्रा
श्रीगणेश स्थापनेच्या दिवशी शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा प्रारंभ नवी पेठमधील भारत दुग्धालयापासून होणार आहे. ही शेभायात्रा नवी पेठ गणेश मंडळ चौक, मद्रास बेकरी चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, गणेश मंदिर, बँक स्ट्रीट नवी पेठमार्गे नवी पेठेत गणेश मंडळाजवळ माघारी अशा मार्गाने मार्गक्रमण करेल. सोमवारी (ता.१४) दुपारी अडीचला सर्वांनी शोभायात्रेत(रथ यात्रा) उपस्थित राहून मिरवणुकीची व उत्सवाची शोभा द्विगुणित करावी, असे आवाहन नवी पेठ गणेश मंडळाचे प्रमोद अग्रवाल अध्यक्ष मनीष झंवर, उपाध्यक्ष शैलेश काबरा, सचिव सुनील जोशी आदींनी केले आहे.