सोन्या चांदीच्या दागिन्यांनी खुलणार गणरायाचे रूप

सोन्या चांदीच्या दागिन्यांनी खुलणार गणरायाचे रूप
Published on
लोगो : स्वागत गणरायाचे फोटो : H29495, H29496 नाशिक : साेने व चांदीचे दागिने परिधान केलेल्या गणेशमूर्ती. -- सोन्या- चांदीच्या दागिन्यांनी गणरायाचे सौंदर्य बहरणार वर्षभरात चांदीचे भाव दुप्पट तरी मागणी कायम; उत्साह शिगेला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३: गेल्या वर्षी गणेशोत्सवात चांदीचे दर १ लाख १७ हजार ५०० रुपये होते तर, यंदा मात्र चांदीचे भाव दुप्पट झालेले असतानादेखील गणपतीला दागिने खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांचा उत्साह जरादेखील कमी झालेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून गणेशाला दागिने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे. सराफ व्यावसायिक दरवर्षी दागिन्यांमध्ये नवनवीन डिझाईन ग्राहकांसाठी बाजारात आणतात. यंदा सुंडा भूषण, हारांचे विविध प्रकार, शमीपत्र, किरीट, फळांचे पाच प्रकार सारख्या दागिन्यांमध्ये वैविध्य बघायला मिळत आहे. गणपतीसाठी दागिने खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडणारे नसले तरी दर महिन्याला देवाजवळ ठराविक रक्कम जमा करून वर्षभरात जमा झालेल्या मोठ्या रकमेतून गणपतीसाठी दागिने खरेदी केले जातात. ही एक प्रकारची गुंतवणूक असून, यामुळे दरवर्षी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात चांदीच्या दागिन्यांमुळे गणरायाच्या सौंदर्यात भर पडते. सोन्यापेक्षा चांदीच्या दागिने खरेदीला प्राधान्य मिळत असल्याने सोन्यामध्ये गणपतीचे दागिने उपलब्ध असले तरी, तुलनेने कमी अगर ग्राहकांची मागणी असेल तर ते बनवून दिले जातात. अन्यथा चांदीच्या दागिन्यांमध्ये दरवर्षी वैविध्य बघायला मिळते. दरम्यान चांदी मौल्यवान धातू असल्याने काही वर्षापासून चांदीच्या मागणीत सोन्याच्या तुलनेने अधिक भाववाढ होत आहे. तसेच चांदीची मागणी देखील वाढलेली असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. --- दागिन्यांमधील वैविध्य सुंडा भूषण (गणपतीच्या सोंडेला वापरला जाणारा दागिना), मोदकांचे वेगवेगळ्या आकारातील दागिने, गणपतीला प्रिय असणाऱ्या जास्वंद, दुर्वा, मोराचे पंख असणारा हार, पळसाचे पान, तांब्या, तबक, घंटी, शमीपत्र, पाच फळे, किरीट (मुकुट) आदी -- चांदीचे भाव २०२५ चांदीचे भाव : १ लाख १७ हजार ५०० २०२६ चांदीचे भाव : २ लाख ३२ हजार --- कोट फोटो : H29499 चांदीचे भाव वाढले असले तरी, सुरुवातीला तुरळक प्रतिसाद होता पण सणाच्या तीन दिवस आधीपासून ग्राहकांची गर्दी वाढली असल्याने रविवारी दुकानाच्या बाहेर काउंटर लावावा लागला आहे. -प्रवीणा दुसाने, व्यवस्थापिका, कॅनडा कॉर्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com