टुडे पान २ साठी... अवतीभवती

टुडे पान २ साठी... अवतीभवती
Published on
धुळे : टुडे पान २ साठी... अवतीभवती --- फोटो : 29505 दिग्नाग वाघची राष्ट्रीय बुद्धिबळात निवड धुळे : भुसावळ (जि. जळगाव) येथे पार पडलेल्या जळगाव झोन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत येथील दिग्नाग कुणाल वाघ याची जळगाव विद्यापीठ संघात राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. जयपूर येथील एपेक्स युनिव्हर्सिटीमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ही राष्ट्रीय स्पर्धा होणार असून, दिग्नाग विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करेल. दिग्नाग हा एस. टी. महामंडळातील कर्मचारी व कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी कुणाल वाघ यांचा मुलगा, तर वकील ॲड. राहुल वाघ यांचा पुतण्या आहे. त्याच्या या निवडीबद्दल जयहिंद संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव प्रा. शरद बच्छाव, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. ए. एस. पाटील, उपप्राचार्य प्रा. वर्षा शिंदे, प्रा. डी. के. पाटील व क्रीडाशिक्षक नितीन वाळके यांनी कौतुक केले. --- स्त्री शिक्षण संस्थेत शिक्षक दिन उत्साहात धुळे : येथील स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई शं. कन्या शाळेत शिक्षक दिन साजरा झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि स्वागतगीताने सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी शाळेचे कामकाज पाहिले. मुख्याध्यापिका रचना मोरे यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापिका पूर्वा चौधरी यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यादी वाचन दामिनी माळी यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी नीता सैंदाणे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष सीए के. यू. नाबरिया, सचिव शिल्पा म्हस्कर, सहसचिव साधना मानेकर, खजिनदार अरुणा नाईक, सदस्या जयश्री शहा, मुख्याध्यापिका छाया नाईक, पर्यवेक्षिका अरुणा सोनवणे, मनीषा पवार, अरुंधती ब्रह्मे, दत्तराज थोरे, प्राथमिक मुख्याध्यापिका अरुणा पानपाटील, बालमंदिर मुख्याध्यापिका सोनाली जोशी उपस्थित होत्या. दक्षता निकम व प्रगती वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. कनिष्का पाटील व प्रीती मुलमुले यांनी सूत्रसंचालन केले. हेमलता बागूल व अध्यक्षा जयश्री शिरोळे यांनी मार्गदर्शन केले. रवींद्र टाकणे, सुज्ञातमती साळी, नीता बागूल, वैशाली सोंजे, धनश्री मुधोळकर, वर्षा जोशी, रंजीता गवते यांनी संयोजन केले. मधुरा पुराणिक यांनी आभार मानले. --- धुळ्याचे प्रा. सुनील बच्छाव सन्मानित धुळे : पुणे येथील शिक्षण संजीवनी मासिकातर्फे झालेल्या सोहळ्यात मेहेरगाव (ता. धुळे) येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सुनील धर्मराज बच्छाव यांना उल्लेखनीय शैक्षणिक व साहित्यिक कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पार पडलेल्या या सोहळ्याच्या बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह स्वाती महाळंक, शिक्षणतज्ज्ञ माधुरी गोखले, लेखक दिलीप गरुड, दिलीप फलटणकर, आंतरराष्ट्रीय मानवअधिकार राज्य संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी, अविनाश सकुंडे, श्रुती कुलकर्णी, प्राचार्य श्याम भुर्के, चंद्रकांत शहासने आणि दीपक जेवणे उपस्थित होते. देवीदास लिमजे व डॉ. संजय जगताप यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा. बच्छाव यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील, सचिव सुधा पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीनल पाटील, संचालक डॉ. मिलिंद पाटील, प्राचार्य विलास पवार, पर्यवेक्षक जे. डी. भामरे यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com