मंडळांसह भाविकांमध्ये चैतन्य तर पोलिसदल सज्ज

मंडळांसह भाविकांमध्ये चैतन्य तर पोलिसदल सज्ज
Published on
मेनफिचर टुडे पान एकसाठी ---------- श्रीगणेशोत्सवाला आता २४ तांसाची प्रतीक्षा -- मंडळांसह भाविकांत चैतन्य; जिल्ह्यात पाच हजारांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्तावर तैनात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : श्रीगणेश चतुर्थीला अवघे २४ तास शिल्लक असताना भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एकीकडे गेल्या तीन दिवसांपासून जळगावात सुरू असलेला पाऊस अन्‌ त्यात भाविकांचा शिगेला पोहोचलेला उत्साह, यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील २ हजार ९९० सार्वजनिक गणेश मंडळांची संपूर्ण तयारी झाली आहे. दरम्यान, गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जिल्‍हा पोलिस दलानेही कंबर कसली आहे. अतिरिक्त पोलिस बलासह पाच हजारांवर जवानांचा फौजफटा यंदा तैनान करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्‍हा पोलिस दलातर्फे प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार उपसण्यात येऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदिप गावित, अशोक नखाते यांच्यासह प्रत्येक उपविभागांतील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या माध्यमातून पोलिस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईसाठीचा ले-आऊट तयार करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून उपद्रवींवर कारवाई केली जात आहे. आता गणेशोत्सवात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर व सर्वसामान्यांच्या हिताला बाधा पोहोचवू शकणाऱ्या गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ व तडीपारीचा प्रतिबंधात्मक ईलाज पोलिस दलाने केलेला आहे. यंदा मंडळांच्या संख्येत वाढ जिल्ह्यात गेल्या वर्षी गणेश मंडळांची संख्या २ हजार ९४६ इतकी होती. यावर्षी त्यात ४४ने वाढ झाली असून, एकूण २ हजार ९९० मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा होणार आहे. यात दोन हजार १६४ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्या ६५३ खासगी मंडळे आहेत. या उत्सवासाठी एसआरपी, होमगार्ड यांचा अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे. बाहेरील बंदोबस्तासह स्थानिक बंदोबस्तात साध्या वेशातील पोलिसांचेही हालचालींवर लक्ष राहणार आहे. --------- यांचाही बंदोबस्तात सहभाग जिल्ह्यातील ३५ ठाण्यांतील विविध शाखांचे प्रभारी पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, अंमलदार (पुरुष), अंमलदार (महिला) असे एकूण ५ हजार अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तकामी तैनातीला राहणार आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, शहर वाहतूक, आर्थिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे एकूण ९ अधिकारी व ८२ कर्मचारी सज्ज आहेत. ---------- चौकट असा आहे पोलिस बंदोबस्त पोलिस अधीक्षक : ०१ अपर पोलिस अधीक्षक : ०२ पोलिस उपअधीक्षक : ०९ प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक : २ आरसीपी - ८ क्यूआरटी - ३ स्ट्रायकिंग फोर्स - ९ एसआरपीएफ - १०० परजिल्ह्यांतूून आलेले डीवायएसपी - ३ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक - १५ महामार्ग वाहतूक पोलिस (एसएसपी) - ७५ रेल्वे पोलिस - २५ जालना पोलिस प्रशिक्षण केंद्र - १५० नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्र - ५० पुरुष होमगार्ड : १,८२३ महिला होमगार्ड : २८६ ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com