महसुल लोक अदालत

महसुल लोक अदालत
Published on
धुळे टुडे १ साठी... --- जिल्ह्यात महसूल लोकअदालत अभियान हेमंत सानप; अपीलदारांना अर्ज करण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १३ ः महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अभियानांतर्गत भूमिअभिलेख विभागाकडे प्रलंबित असलेली अपील, पुनरीक्षण, पुनर्विलोकन, तसेच इतर दावे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी संबंधितांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप यांनी केले आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धुळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर, तसेच नगर भूमापन अधिकारी, धुळे यांच्या स्तरावरील प्रकरणे शासनाच्या सूचनांनुसार लोकअदालत अभियानाद्वारे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. अभियान कालावधी असा या अभियानांतर्गत जिल्हा व अधिनस्त सर्व तालुकास्तरावर सकाळी अकरापासून लोकअदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे. वेळापत्रक असे ः २३ सप्टेंबर, २३ डिसेंबर २०२६, २४ मार्च २०२७. संबंधित अपीलदार, सामनेवाले अथवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, धुळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर, तसेच नगर भूमापन अधिकारी, धुळे यांच्या कार्यालयांमध्ये उपस्थित राहून लोकअदालत तडजोडनामा अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक सानप यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com