शिक्षक हा महत्वाचा

शिक्षक हा महत्वाचा
Published on
आजच आवश्‍यक टुडे चारसाठी ------ NSK26H29521 जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सन्मान केलेल्या शिक्षकांसोबत आमदार एकनाथ खडसे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, ईजाज मलिक, भास्कर काळे, अशोक लाडवंजारी आदी. -------- शिक्षकांच्या अडचणींबाबत अधिवेशनात जाब विचारू ------ आमदार एकनाथ खडसे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे शिक्षकांचा सत्कार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१३ : शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. तो युवापिढी घडविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. परंतु, महाराष्ट्र शासन शिक्षकांकडून सर्व कामे करून घेऊनही त्यांना ‘इटीटी’सारखी परीक्षा द्यावी लागते. तो शिक्षक आता लागलेला असो की, २० वर्षांपूर्वीचा असो. हे चुकीचे आहे, यासाठी येणाऱ्या राज्यविधी मंडळाच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल. शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे व राहील, असे आश्‍वासन माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिक्षक आघाडीतर्फे आमदार खडसे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने ४५ शिक्षकांना पुरस्कार देऊन रविवारी (ता.१३) पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सन्मानित करण्यात आले, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार खडसे बोलत होते. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, प्रदेश सरचिटणीस ईजाज मलिक, जिल्हा निरीक्षक भास्कर काळे, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, समन्वयक विकास पवार, महानगर कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिग सूर्यवंशी, राजू मोरे, ‌जिल्हा उपाघ्यक्ष किरण राजपूत, सरचिटणीस सुनील माळी, राष्ट्रवादी युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, उत्तर महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाचे अघ्यक्ष रमेश बारे, जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे, महानगर जिल्हाध्यक्ष रईस खाटीक, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, महानगर जिल्हाध्यक्ष गिरीश सांगळे, जिल्हा उपाघ्यक्षा सुमन बनसोडे, चिटणीस माधुरी पाटील, शिक्षक आघाडीचे कार्याध्यक्ष पंकज सूर्यवंशी, सरचिटणीस जिया बागवान, सहसरचिटणीस विजय विसपुते, शिक्षक अविनाश सरदार, महेश तायडे उपस्थित होते. रोहिणी खडसे-खेवलकर, श्री. मलिक, श्री. काळे, श्री. महाजन, मनपा प्रशासनधिकारी खलील शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण धनगर यांनी केले. मुस्ताक भिस्ती यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com