शहर टुडे पान चारसाठी आजच घ्यावी
--------------------
NSK26H29531
जळगाव : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नियुक्तीपत्रे प्रदान कार्यक्रमात करीम सालार, जिल्हाध्यक्ष जमील शेख, उपाध्यक्ष संदीप पाटील, मुक्ती हरुन आदी.
------
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नागरी
समस्यांवर आवाज उठवावा
--
मान्यवरांचे मार्गदर्शन; पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१४ : शहरात सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. रस्त्यावरील खड्डे, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छतेची समस्या, बंद असलेले पथदिवे याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवून आंदोलन करीत झोपलेल्या महापालिकेला जागे करावे, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी रविवारी (ता.१३) नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यात केले.
येथील काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ. अरविंद कोलते, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, सरचिटणीस मुक्ती हरुन, माजी उपमहापौर करीम सालार, जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, उदयसिंग पाटील, डॉ. ए. जी. भंगाळे, प्रदेश सचिव डॉ. ईश्वरी राठोड उपस्थित होते. यावेळी शहरातील चार ब्लॉक अध्यक्ष व शहर कार्यकारिणीचे २५ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळी, विशाल पवार व संदीप घोरपडे यांनी केले. जगदीश गाडे यांनी आभार मानले. राहुल भालेराव, अनंत परिहार, उद्धव वाणी, प्रदीप सोनवणे, देवीदास ठाकरे, आशितोष पवार, सागर सपके, राजेश कोतवाल, सखाराम मोरे, कपिल अहमद, राजेश मंडोरा, नूर देशमुख, विष्णू घोडेस्वार, मनोज वाणी, मीरा सोनवणे, अरुणा पाटील, मालोजी पाटील, युवराज खडके, कामिल खान, डॉ. सज्जाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.