गणरायाच्या स्वागतासाठी नंदुरबारची बाजारपेठ सजली

गणरायाच्या स्वागतासाठी नंदुरबारची बाजारपेठ सजली
Published on
(टुडे पान एक मेन लिड) फोटो : NSK26H29555 फोटो : नंदनगरीतील होलार वाड्याच्या राजाचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. या भव्यदिव्य मूर्तीने गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. फोटो : NSK26H29530 / NSK26H29528/ नंदुरबार : विविध दुकानांवर विक्रीसाठी दाखल झालेल्या आकर्षक गणेशमूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात खरेदीसाठी गणेशभक्तांची झालेली गर्दी. शेवटच्या छायाचित्रात सजावट साहित्याचे स्टॉल. फोटो : NSK26H29533 नंदुरबार : गणेशभक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे धुळे रोडवर झालेली वाहतूक कोंडी. --- गणरायाच्या स्वागतासाठी नंदुरबारची बाजारपेठ सजली पूर्वसंध्येला खरेदीसाठी जनसागर उसळला नंदुरबार, ता. १३ : गणेशोत्सवाला सोमवार (ता. १४)पासून प्रारंभ होत असून, लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघी नंदुरबार नगरी सज्ज झाली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलली असून, गणेशभक्तांकडून जोरदार तयारी सुरू आहे. पूजा साहित्य आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रविवारी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे दिसून आले. विविध गणेश मंडळांनी कारखान्यांमधून मोठ्या मूर्ती खरेदी केल्या असून, आता घरगुती मूर्ती खरेदीसाठी गणेशभक्त बाजारपेठेत दाखल होत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागातही गणेशोत्सवाचा जोश पहायला मिळत असून, गणेशोत्सवामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. स्टॉल्सवर झुंबड शहरातील मुख्य बाजारपेठेसह मोठा मारुती चौक, धुळे रोड, सुभाष चौक, नेहरू पुतळा परिसरात गणेशमूर्तींचे शेकडो स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यंदा पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींनाही गणेभक्तांकडून मोठी पसंती दिली जात आहे. बालगोपाळांसह नागरिक गणरायाची मूर्ती नोंदणी करण्यासाठी आणि घरी नेण्यासाठी दुकानांवर गर्दी करत आहेत. बाजारपेठ लखलखली यंदा बाजारपेठेत आरास सजावटीसाठी लागणारे आकर्षक मखर, थर्माकोलसह कागदी आणि कापडी सजावट साहित्य, पूजेचे साहित्य, रंगीबेरंगी एलईडी दिव्यांना मोठी मागणी आहे. फुलांच्या बाजारपेठेत झेंडू आणि शेवंतीच्या फुलांचे भाव कडाडले आहेत. मिठाई, प्रसादाच्या दुकानांत गर्दी गणरायाचा आवडता प्रसाद असलेल्या मोदक खरेदी करण्यासाठी मिठाईच्या दुकानांमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. मावा मोदक, काजू मोदक आणि बुंदीच्या लाडूंना ग्राहकांची पसंती आहे. घरगुती गणपतीसाठी लागणारे पंचामृत, दुर्वा, शमी पत्र आदी पूजा साहित्य आणि सुकामेवा खरेदीसाठी दुकानांसमोर रांगा लागत आहेत. सोमवारी गर्दी वाढणार घरगुती गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारात गणेशभक्तांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. घरगुती मूर्तीच्या किमतीतही यंदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ५०० रुपयांपासून पाच हजारंपर्यंतच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. चोख बंदोबस्त उत्सवाच्या काळात शहरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि शांतता राखली जावी, यासाठी नंदुरबार पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून, संवेदनशील भागात जादा पोलिस बळ तैनात करण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळांनीही प्रशासनाचे नियम पाळून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com