शेतकऱ्यांसाठी खत खरेदी आता ‘डिजिटल

शेतकऱ्यांसाठी खत खरेदी आता ‘डिजिटल
Published on
ॲंकर टुडे पान एकसाठी --- (सूचना : बातमीत इंग्रजी शब्‍द आहेत.) --------------------- (समर्पक छायाचित्र वापरा) --- शेतकऱ्यांसाठी आता खतांची खरेदी ‘डिजिटल’ --------- ‘एफएफएस’ प्रणालीची २५पासून अंमलबजावणी; मोबाईलवरूनही करता येणार नोंदणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानित खत खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, सुलभ व गतिमान करण्याच्या उद्देशाने ‘फार्मवर्क फाॅर फर्टीलायझर सेल’ (FFS) ही डिजिटल प्रणाली सुरू केली जात आहे. या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे अधिकृत खत विक्री केंद्रावर आवश्यक खताची आगाऊ नोंदणी (बुकिंग) करता येणार आहे. याची अंमलबजावणी येत्या २५ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. खरीप व रब्‍बी हंगामात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी केली जाते. अनेकदा खत खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्‍याने शेतकऱ्यांना रांगेतदेखील उभे राहावे लागते. अनेकदा तर ऐनवेळी खतांची उपलब्‍धतादेखील होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना खतांचा डोस देण्यास काही दिवस प्रतिक्षा करावी लागते. परंतु, आता ‘एफएफएस’ या प्रणालीमुळे हे सर्व कमी होईल. अडचणी कमी होणार ‘एफएफएस’ या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे खताची आगाऊ नोंद करता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. शिवाय नजीकच्या अधिकृत खतविक्री केंद्राची माहिती, उपलब्ध खताबाबतची माहिती व खरेदीशी संबंधित डिजिटल नोंद यामुळे शेतकऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत. वितरणात पारदर्शकता डिजिटल प्रणालीमुळे अनुदानित खताच्या विक्री व वितरणप्रक्रियेत अधिक पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या खत खरेदीची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार असल्याने प्रक्रिया अधिक व्यवस्थित व सुलभ होण्याची अपेक्षा आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ‘FFS Farmer App’ ही प्रणाली डाउनलोड करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ---------- कोट शेतकऱ्यांनी आता आगाऊ नोंदणी (बुकिंग) करून योग्यवेळी खत मिळवावे, सोबतच डिजिटल पद्धतीने सुलभ खतखरेदीचा लाभ घ्यावा. हे करणे शेतकऱ्यांसाठी अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे या पद्धतीचा वापर अधिकाधिक शेतकऱ्यांनी करावा. - पद्मनाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com