हरितालिका पूजनासाठी मंदिरांमध्ये महिलांची गर्दी

हरितालिका पूजनासाठी मंदिरांमध्ये महिलांची गर्दी
Published on
टुडे पान चारसाठी -------------- NSK26H29595 जळगाव : हरतालिकेनिमित्त चिमुकले राम मंदिरात सोमवारी पुजा करताना महिला. -------------- हरितालिकेनिमित्त मंदिरांत महिलांची गर्दी ---- पारंपरिक वेशभूषेत सहभाग; शिव-पार्वतीच्या पुजेसाठी पहाटेपासून लगबग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : सौभाग्य, सुख-समृद्धी व पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रद्धेने पाळल्या जाणाऱ्या हरितालिका तृतीयेचा उत्साह सोमवारी (ता.१४) शहरात पाहायला मिळाला. हरितालिका पुजनासाठी महिला पहाटेपासूनच मंदिरांकडे जात असल्‍याचे चित्र होते. विविध मंदिरांत शिव-पार्वतीची विधिवत पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रीगणेश चतुर्थीच्‍या पूर्वसंध्येला हरितालिका तृतीयाचे व्रत येत असते. परंतु, यंदा अनेक वर्षांनंतर हरितालिका व्रत व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्‍याने महिलांची अधिकच लगबग पाहावयास मिळाली. हरितालिकेनिमित्त महिलांनी पारंपरिक पद्धतीने व्रत व उपवास केला. पुजेसाठी आवश्यक असलेल्या पत्री, फुले, फळे, नारळ, विड्याची पाने, सुपारी व विविध पुजासाहित्याची खरेदी यापूर्वीच करण्यात आली होती. तर दुपारी गणपती प्रतिस्‍थापना असल्‍याने सकाळपासून मंदिरांत महिलांची वर्दळ वाढली होती. हरितालिकेच्या दिवशी शिव-पार्वतीच्या प्रतिमेची किंवा वाळू-मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची पूजा करण्याची परंपरा आहे. महिलांनी विधिवत पूजन करून फुले, बेलपत्र, फळे व नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर आरती करून हरितालिका व्रताची कथा ऐकण्यात आली. अनेकांनी मंदिरात जावून पुजा केली, तर काही महिलांनी आपल्‍या दारापुढेच वाळूचे शिवलिंग तयार करीत पूजन केले. भक्तिमय वातावरण शहरातील विविध मंदिरांत सकाळपासून पुजाविधी सुरू होती. महिलांच्या भजन-कीर्तनाने व हर-हर महादेवच्या जयघोषांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. दिवसभर महिला भाविकांची मंदिरांत ये-जा सुरू होती. अनेक ठिकाणी महिलांनी सामूहिकरीत्या हरितालिका पूजन करून व्रताची सांगता केली. ------ इन्‍फो आज ऋषिपंचमी ऋषिपंचमीनिमित्ताने सप्‍तऋषींचे पुजन केले जात असते. त्‍यानुसार मंगळवारी (ता.१५) ऋषिपंचमी आहे. यानिमित्त भाविक नद्यांवर स्‍नानासाठी जातात. त्यामुळे जिल्‍ह्यातील रामेश्‍वर येथील त्रिवेणी संगम, संत मुक्‍ताई देवस्‍थान यांसह तापी, गिरणा नदीवर भाविकांची स्‍नानासाठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com