मेनफिचर
-----------
लोगो : विधायक
----
NSK26H29572
जळगाव : श्रीगणेश चतुर्थीनिमित्त ‘उमेद’च्या महिला स्वयंसहाय्यता समूहाने लावलेला मूर्ती विक्रीचा स्टॉल व समूहाच्या सदस्या.
-------
‘उमेद’च्या महिला स्वयंसहाय्यता समूहांची लाखोंची उलाढाल
--------
श्रीगणेश चतुर्थीनिमित्त मूर्ती-मोदक विक्रीतून उद्योजकतेला मिळाली नवी दिशा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-‘उमेद’च्या माध्यमातून गणेश चतुर्थीनिमित्त महिला स्वयंसहाय्यता समूहाने गणेश मूर्तीसह विविध साहित्य विक्रीस ठेवले. त्यात लाखोंची उलाढाल झाली. या माध्यमातून महिलांच्या उद्योजकतेला नवी दिशा मिळाली.
स्वावलंबनाचा आदर्श
ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिलांनी पारंपरिक कौशल्याला व्यवसायाची जोड देत स्वतःचे उद्योग उभारावेत व कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालावी, या उद्देशाने ‘उमेद’ अभियानामार्फत सातत्याने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे.
या उपक्रमाचा एक प्रेरणादायी भाग म्हणून श्रीगणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महिला स्वयंसहाय्यता समूहांनी गणपती मूर्ती व विविध प्रकारच्या मोदकांच्या विक्रीचे स्टॉल उभारले. या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने या उपक्रमातून लाखोंची उलाढाल झाल्याचे दिसून आले. पारंपरिक सणाला रोजगार व उद्योजकतेची जोड देत महिलांनी आपल्या मेहनतीतून आर्थिक स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने गणेश चतुर्थीनिमित्ताने प्रभाग समन्वयक हेमांगी टोकेकर (जिल्हा परिषद गण नशिराबाद-भादली बुद्रुक) यांनी महिला स्वयंसहायता समूहांना मार्गदर्शन करून या स्टॉलचे आयोजन केले होते. जळगाव तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र सूर्यवंशी, टोकेकर यांच्या मार्गदर्शनाने चैतन्य, झिपरू अण्णा व गंगाई या तीन महिला स्वयंसहायता समूहांनी स्टॉल लावले. वैशाली तारकस, दिपाली धनगर, मनीषा धनगर, स्वाती सोनवणे, शोभा मोते, वैशाली नाले या उमेद अभियानाच्या सहा ग्रामसखींनी सहकार्य केले.
--------
कोट
‘उमेद’च्या महिला स्वयंसहाय्यता समूहांची एकजूट, कौशल्य व मेहनतीमुळे सणाला व्यवसायाची जोड मिळाली. गणपती मूर्ती व मोदक विक्रीतून लाखोंची उलाढाल करीत ग्रामीण महिलांनी आर्थिक स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
- हेमांगी टोकेकर, प्रभाग समन्वयक.
------
चौकट
घरगुती मोदकांना विशेष पसंती
श्रीगणेशोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे मोदक. महिला स्वयंसहाय्यता समूहांनी पारंपरिक पद्धतीने तयार केलेले उकडीचे मोदक, तळणीचे मोदक व विविध चवींचे आकर्षक स्वरूपातील मोदक विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.