जी.टी.पाटील महाविद्यालयात आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात

जी.टी.पाटील महाविद्यालयात आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात
Published on
फोटो : NSK26H29591 नंदुरबार : क्रॉस कंट्री स्पर्धेचे उद्‌घाटन करताना प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी. शेजारी डॉ. आर. सी. बेडसे, डॉ. एच. एन. सरदार, डॉ. नीलिमा पाटील. -------------------- नंदुरबारला आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात नंदुरबार, ता. १४ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विद्यापीठस्तरीय आंतरविभागीय क्रॉस कंट्री पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वातावरणात करण्यात आले. जी. टी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. स्पर्धेत विद्यापीठाच्या चारही विभागांतील उत्कृष्ट खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत एकूण २४ पुरुष व २४ महिला खेळाडू सहभागी झाले होते. खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक भावना, शिस्त व क्रीडावृत्तीचे दर्शन घडविले. याप्रसंगी विद्यापीठ निवड समितीचे सदस्य डॉ. आर. सी. बेडसे, डॉ. एच. एन. सरदार व डॉ. नीलिमा पाटील, संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक उपस्थित होते. पुरुष गटात जळगाव विभागाने प्रथम, धुळे विभागाने द्वितीय आणि नंदुरबार विभागाने तृतीय स्थान प्राप्त केले. महिला गटात धुळे विभागाने प्रथम, नंदुरबार विभागाने द्वितीय आणि जळगाव विभागाने तृतीय स्थान प्राप्त केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील क्रीडा विभाग व जिमखाना समितीचे सदस्य सहाय्यक प्रा. एम. बी. पाटील, लेफ्ट. डॉ. व्ही. झेड. चौधरी, मनीष सावंत यांनी परिश्रम घेतले. क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com