फोटो : NSK26H29582
नंदुरबार : हिंदी दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थींनीसमवेत उपस्थित शिक्षक.
--------------------
डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा
नंदुरबार, ता. १५ : येथील काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक मिलिंद चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सीमा मोडक, संजय चौरे, रेखा गोसावी, जितेंद्र पगारे, चंद्रशेखर चौधरी, गणेश चौधरी व कल्याणी पाटील उपस्थित होते. मिलिंद चव्हाण व प्रमुख अतिथी सीमा मोडक यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रत्येक वर्गासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. घोषवाक्य स्पर्धेत प्रथम प्रांजल चव्हाण, द्वितीय स्वरा गिरासे, तृतीय कनिष्का प्रसाद, सुंदर लेखन स्पर्धेत प्रथम नेहा गांगुर्डे, द्वितीय समृद्धी ठाकरे, तृतीय ज्योती मोरे, हिंदी काव्य वाचन स्पर्धेत प्रथम गायत्री माळी, द्वितीय राधिका चौधरी, तृतीय निरमा जांगिड, कथाकथन स्पर्धेत प्रथम नुपूर गिरासे, द्वितीय वैष्णवी धनगर, तृतीय ज्योत्स्ना गावित व उत्तेजनार्थ आराध्या गावित, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सोनाक्षी परदेशी, द्वितीय दक्षता पाटील, निकिता चव्हाण, तृतीय अश्विनी बिरारे, धारिका शिरसाठ, उत्तेजनार्थ पलक ढिवरे, निबंध स्पर्धेत प्रथम माधवी मोरे, दिव्या तांबोळी, द्वितीय सोनाक्षी गांगुर्डे, निरंकारी अहिरे, तृतीय जान्हवी धनगर, सोनाक्षी बावा विजेते ठरले. उपशिक्षक जितेंद्र पगारे, सीमा गावित, शांताराम पाटील यांनी कविता सादर केल्या. विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्पर्धाचे जितेंद्र पगारे, चंद्रशेखर चौधरी, गणेश चौधरी, कल्याणी पाटील यांनी परिश्रम घेतले. संजय चौरे यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र पगारे, चंद्रशेखर चौधरी यांनी आभार मानले.