टुडे पान २ साठी... अवतीभवती

टुडे पान २ साठी... अवतीभवती
Published on
धुळे : टुडे पान २ साठी... अवतीभवती -- महिलांसाठी धुळ्यात आज अथर्वशीर्ष पठन सोहळा धुळे : येथील शिवाजी रोडवरील सिद्धेश्वर गणपती मंदिर व योगविद्यावर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेश्वर गणपती मंदिरात फक्त महिला व युवतींसाठी विशेष ''गणपती अथर्वशीर्ष पठन कार्यक्रमाचे'' आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा ऋषीपंचमी या तिथीवर मंगळवारी (ता. १५) सायंकाळी पाचला होणार आहे. सोहळ्याचे यंदाचे १७ वे वर्ष आहे. या मंगलमय उपक्रमात जास्तीत जास्त महिला व युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. -- गोताणेत समाधान पाटील यांचा सत्कार धुळे : शासनाच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षक भरती प्रक्रियेतून गोताणे (ता. धुळे) येथील समाधान भटू पाटील यांची मुंबई महापालिकेंतर्गत प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली. शालेय शिक्षण विभागाच्या ‘पवित्र’ पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. समाधान पाटील हे अभ्यासू असून त्यांना शिक्षणातून सामाजिक कार्याची आवड आहे. गावात शिक्षणविषयक जनजागृतीसारख्या उपक्रमांत त्यांनी सहभाग घेऊन उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल गोताणे आणि परिसरातील ग्रामस्थांनी सत्कार करून कौतुक केले. तरुण मित्र मंडळाच्या वतीने गावात मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. -- देवगिरी वसतिगृहात आरोग्य शिबीर धुळे : देवगिरी कल्याण आश्रम कन्या वसतिगृहात धन्वंतरी आयुर्वेदिक शिक्षण संशोधन संस्थेतर्फे विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. धुळे येथील वैद्य प्रवीण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्य चिन्मयी कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सेवाभावी उपक्रम राबविला. शिबिरात विद्यार्थिनींचे मुख व दंत आरोग्य, त्वचा तसेच कान, नाक आणि घसा यांची तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात आले. याशिवाय दैनंदिन जीवनशैली, दिनचर्या आणि योग्य आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात वैद्य चिन्मयी कुलकर्णी, वैद्य दीक्षिता सिसोदिया, वैद्य स्वाती राठोड, वैद्य केशिनी मांडिये, वैद्य ऋता सावलीया आणि वैद्य नेहा डोडीया यांनी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केली. वसतिगृहाच्या अधिक्षिका अश्विनी वळवी आणि आहार व्यवस्थापिका उमा पाडवी यांनी सहकार्य केले. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com