धुळे टुडे १ साठी...(शिल्लक, तपासून घ्यावी)
---
जिल्ह्यात महसूल लोक अदालत अभियान
---
हेमंत सानप; अपीलदारांना अर्ज करण्याचे आवाहन
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अभियानांतर्गत भूमि अभिलेख विभागाकडे प्रलंबित असलेली अपील, पुनरिक्षण, पुनर्विलोकन तसेच इतर दावे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी संबंधितांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप यांनी केले आहे.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख धुळे, उपअधीक्षक भूमि अभिलेख धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तसेच नगर भूमापन अधिकारी, धुळे यांच्या स्तरावरील प्रकरणे शासनाच्या सूचनांनुसार लोक अदालत अभियानाद्वारे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.
अभियान कालावधी असा
या अभियानांतर्गत जिल्हा व अधिनस्त सर्व तालुकास्तरावर सकाळी अकरापासून लोकअदालतांचे आयोजि करण्यात येणार आहे. वेळापत्रक असे : २३ सप्टेंबर, २३ डिसेंबर २०२६, २४ मार्च २०२७. संबंधित अपीलदार, सामनेवाले अथवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, धुळे, उपअधीक्षक भूमि अभिलेख धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तसेच नगर भूमापन अधिकारी, धुळे यांच्या कार्यालयांमध्ये उपस्थित राहून लोक अदालत तडजोडनामा अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक श्री. सानप यांनी केले आहे.
---