मौल्यवान ‘श्री’च्या सुरक्षिततेची जबाबदारी गणेश मंडळावरच

मौल्यवान ‘श्री’च्या सुरक्षिततेची जबाबदारी गणेश मंडळावरच
Published on
पान तीन मेन -------------------------- (सकाळ विशेष लोगो वापरावा) .... मौल्यवान ‘श्री’च्या सुरक्षिततेची जबाबदारी मंडळावरच लहान-मोठे साडेसातशे गणेश मंडळाकडून श्रींची प्रतिष्ठापना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता १४ : लाडक्या गणरायाच्या स्वागतासह गणेशाेत्सवाला  सोमवारी (ता.१४) जल्लाेषात प्रारंभ झाला आहे.  शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ७३० सार्वजनिक गणेशाेत्सव मित्र मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली असून यात ३१  मौल्यवान गणपतींचा समावेश आहे. या मौल्यवान गणरायावर तब्बल ६८० किलोपेक्षा अधिक सोन्या- चांदीची कोट्यवधी रुपयांचे दागिने, अलंकार आहेत. दरम्यान,  पोलिस ठाण्यांनी या मौल्यवान गणेश मंडळांना बंदोबस्त पुरविण्यासह मंडळ पदाधिकाऱ्यांनाही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.  गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीपर्यंत पाेलिस अधिकारी, अकार्यकारी आस्थापना, क्युआरटी, एसआरपीएफ आणि हाेमगार्ड असा तब्बल साडेतीन हजारांहून अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात घरगुती गणेशोत्सव वगळता विविध उपनगरे, मुख्य ठिकाणे मिळून ७३० ठिकाणी सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना अटी व शर्तींच्या अधीन राहून पोलिस आयुक्तालयाने परवानगी दिली आहे.  पंचवटी, सरकारवाडा, भद्रकाली, सातपूर, अंबड, उपनगर आणि देवळाली कँम्प पाेलिसांच्या हद्दीत एकूण ३१ मौल्यवान गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील मंदिर आणि गणेशमूर्तींवर ६८० किलाे चांदी, जवळपास तीन किलाेंहून अधिकचे साेन्याचे अलंकार आहेत. त्यामुळे गणेशाेत्सवात चाेरी, घरफाेडी व अन्य काही घटना घडू नये, यासाठी माैल्यवान गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना ‘अलर्ट’ करण्यात आले आहे. स्थानिक पाेलिस ठाण्यांनी देखिल एक अंमलदार, दाेन हाेमगार्डचा बंदाेबस्त पुरविला आहे. .... मौल्यवान मंडळे मंडळे - ............... मौल्यवान अलंकार सरदार चौक ............. ३५ किलो चांदीचे दागिने एस.एफ.सी फाऊंडेशन, हिरावाडी ..........६ किलो चांदीची गणेश मूर्ती नवजीवन सांस्कृतिक, पंचवटी ............. ७०० ग्रॅम चांदीची गणेश मूर्ती नवनिर्माण कला व क्रीडा, हेमकुंज ......... ११ किलो चांदीची गणेश मूर्ती सूर्यप्रकाश नवप्रकाश, घनकर लेन ......... ११ किलो चांदीची गणेश मूर्ती तिळभांडेश्वर लेन .......... ११ किलो चांदीची मूर्ती व १५१ ग्रॅम सोन्याचे दागिने पगडबंद लेन ......... ५१ किलो चांदीची गणेश मूर्ती व ११ ग्रॅम सोन्याचे दागिने अशोकस्तंभ ........ २१ किलो चांदीची गणेश मूर्ती मानाचा राजा ...........२ पाय, एक हात, दोन दात, एक बाळी, एक मूषक, हार व ७ किलो चांदी रविवार कारंजा गणेश ......... १५१ किलो चांदीची मूर्ती व १.२५ ग्रॅम चांदीचे दागिने साक्षी गणेश, भद्रकाली .......... सोन्याचे हार व चांदीचे दागिने शिवसेना युवक मित्र, मेनरोड ........ सोन्याचे हार व चांदीचे दागिने जाणता राजा, डिंगरआळी ............. चांदीचे दागिने युवक उन्नती, भद्रकाली फ्रूट मार्केट ......... सोन्याचे दागिने उत्कृष्ठ, नाईकवाडीपुरा ...... चांदीचे दागिने व चांदीचा टोप रोकडोबा ........... सोन्याचे दागिने नवक्रांती, काठेगल्ली ..........३४ किलो चांदीची गणेश मूर्ती व ४८ किलो सिंहासन रजत नवश्या बहुउद्देशीय संस्था, अशोकनगर ..........२५ किलो चांदीची गणेश मूर्ती बजरंग, अंबड-लिंक रोड .......... २.५ किलो चांदीची गणेश मूर्ती एकता विविध विकास सेवा, राजरत्ननगर ........ ५ किलो चांदीची गणेश मूर्ती श्रीकृष्ण कला क्रीडा व सांस्कृतिक, अंबड -.... ११ किलो चांदीची मूर्ती, २ किलो उंदीर, २ किलो सिंहासन अभिनव, तेलीगल्ली, भगूर ............ ६.५ किलो चांदीची गणेश मूर्ती भगूर हनुमान मंदिर ............ १.१४० ग्रॅम चांदीची गणेश मूर्ती वंदे मातरम् संघटना, भगूर - ८.२५ तोळे सोन्याची गणेश मूर्ती तरूण उत्सव, भगूर ........... ७ किलो चांदीचे अलंकार इच्छापूर्ती गणेश मंदिर, देवळाली कॅम्प .......... २ किलो चांदीची गणेश मूर्ती बालाजी फाऊंडेशन, नाशिक रोड .......... ३० किलो चांदीची गणेश मूर्ती व ५ ग्रॅम सोने इच्छापूर्ती गणेश, गांधीनगर ........... ५.५ किलो चांदीची गणेश मूर्ती इगल स्पोर्ट अँड सोशल क्लब, नाशिक रोड -............२६ किलो चांदीची गणेश मूर्ती सौभाग्यनगर, लॅम रोड ................ ५.३६ ग्रॅम चांदीची गणेश मूर्ती व १ ग्रॅम सोन्याचे अलंकार विजय अमरदीप, देवळाली कॅम्प ......... ११ किलो चांदीची गणेश मूर्ती ......... सुरक्षिततेच्या सूचना - गणेश मंडपात उच्च प्रतीचे व नाईट व्हिजन सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवावी - पदाधिकाऱ्यांनी विश्वासू स्वयंसेवकांची २४ तास नेमणूक करावी - रात्रीच्या वेळी जागते पहारेकरीही नेमावे - गर्दीत स्वयंसेवक तैनात करावेत - संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ डायल ११२ वा पोलिसांना कळवावे .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com