श्री गणेशा आरोग्याचा अभियान

श्री गणेशा आरोग्याचा अभियान
Published on
धुळे टुडे १ साठी ॲंकर... --- धुळे जिल्ह्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’ --- गणेशोत्सवानिमित्त आयोजन; मोफत तपासणी, आयुष्मान कार्ड व गर्भवतींसाठी विशेष शिबिरे सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १३ : गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतानाच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरोग्यसेवा थेट गरजूंपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान हे अभियान राबविले जाईल. जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, धुळे शहरातील विविध रुग्णालये, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सहायक आयुक्त धर्मादाय कार्यालय तसेच महात्मा फुले जनआरोग्य अभियानाशी संलग्न रुग्णालयांच्या संयुक्त सहभागातून जिल्हाभरात हे अभियान राबविले जाणार आहे. मोफत आरोग्यसेवा अभियानाच्या कालावधीत दररोज विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी, दातांची तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी तसेच आवश्यक औषधोपचार मोफत करण्यात येईल. त्याचबरोबर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरेही घेतली जातील. विशेष शिबिरे नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी आयुष्मान भारत कार्ड तसेच वयोवंदना आयुष्मान कार्ड शिबिरे घेतली जातील. त्यामुळे पात्र नागरिकांना आरोग्य योजनांशी जोडण्यासही या अभियानातून चालना मिळणार आहे. तसेच अभियानांतर्गत गर्भवती महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असून, त्यांच्यासाठी आवश्यक आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य अभियानाशी संलग्न खासगी रुग्णालये, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथेही मोफत आरोग्य शिबिरे होतील. शिबिरांचा लाभ घ्यावा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी जवळच्या आरोग्य शिबिरात सहभागी होऊन या मोफत आरोग्यसेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विसपुते यांनी केले आहे. अभियानाच्या नियोजन व शिबिरांबाबत अधिक माहितीसाठी डॉ. योगेश पाटील यांच्याशी किंवा cmrfdhule@gmail.com या ई- मेलवर संपर्क करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडून कळविण्यात आले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com