आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा
Published on
धुळे : टुडे पान २ साठी... अँकर -- हस्ती स्कूलमध्ये हिंदी सप्ताह उत्साहात -- विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विषयांवर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : दोंडाईचा येथील दाऊळ शिवारातील हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि हिंदी सप्ताह औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे मार्गदर्शक तथा अध्यक्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा उत्साहात पार पडली. - हस्ती गुरुकुलच्या मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यास संस्थेचे पीटीए सदस्य मधुकर अहिरराव, प्राचार्या रजिया दाऊदी, प्राचार्य जीवन सपकाळे, मुख्याध्यापक सदाशिव महाजन, समन्वयक मनोज ठाकूर आणि मंगलसिंग राजपूत हे प्रमुख पाहुणे व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी दोन गट पाडण्यात आले होते. गट ‘अ’ मध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण बचाओ जीवन बचाओ, मोबाईल छोडो मैदान पर दौडो आणि मेरी अनोखी पाठशाला असे समकालीन विषय ठेवण्यात आले होते. या गटात रुचिता पाटील (हस्ती गुरुकुल) हिने प्रथम, शौर्य घरटे (हस्ती वर्ल्ड स्कूल) याने द्वितीय, तर नक्षत्रा राजपूत (हस्ती पब्लिक स्कूल) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच दिव्या राजपूत हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. - गट ‘ब’ मध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नशामुक्त भारत, आज के युवा और सोशल मीडिया का प्रभाव आणि भारतीय संस्कृति और हमारे संस्कार यांसारख्या गंभीर व वैचारिक विषयांवर स्पर्धा रंगली. या गटात प्रियांशी जाधव (हस्ती पब्लिक स्कूल) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मिताली वाघ हिने द्वितीय आणि कार्तिकी पाटील हिने तृतीय स्थान मिळविले. या गटात वंशिका अहिरराव (हस्ती गुरुकुल) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. स्पर्धेचे परीक्षण गट ‘अ’ साठी समन्वयक मंगलसिंग राजपूत व सीमा भोई यांनी तर गट ‘ब’ साठी प्राचार्या रजिया दाऊदी व प्रविण माळी यांनी केले. संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. विभागप्रमुख मनोज ठाकूर व हिंदी विभागातील सर्व शिक्षकांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com