धुळे : टुडे पान २ साठी... ( जागा नसल्यास अँकर म्हणून ही बातमी घेणे )
--
फोटो क्रमांक : 29639
धुळे : कैलासनगरचा राजा गणपतीच्या स्वागत मिरवणुकीत सहभागी महिला.
--
कैलासनगरचा राजा गणपतीचे दिमाखात स्वागत
--
स्वागत मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; जयघोषाने परिसर दुमदुमला
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : चितोड रोडवरील लीलाबाई चाळ स्मशानभूमीलगतच्या कैलासनगर परिसरात श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर गणेश उत्सव समितीतर्फे ‘कैलासनगरचा राजा’ गणरायाचे रविवारी (ता. १३) सायंकाळी ढोल- ताशांच्या गजरात आगमन झाले. यंदा या गणेशोत्सवाचे बारावे वर्ष असून, यानिमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
गणरायाच्या स्वागत मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला. रस्त्यामध्ये रांगोळ्या काढून आणि प्रत्येक घरासमोर आरत्या ओवाळून नागरिकांनी बाप्पाचे मनोभावे स्वागत केले. संपूर्ण परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. समितीचे अध्यक्ष भोला परदेशी, उपाध्यक्ष सुनील पाटील व दर्शन बागले, खजिनदार दिनेश निकम, तसेच सदस्य अजय मोरे, जयेश निकम, नीलेश पांढरे, चेतन परदेशी, रोहित गर्दे, कुणाल वाघ, मुन्ना परदेशी, किसन राजपूत, मयूर जाधव, प्रफुल्ल सोनार, अजिंक्य भामरे, साई सोनार, नितीन सोनार, स्वामी सोनार, सम्यक झणके, बालाजी बागूल, हर्शल रावताला, कल्पेश परदेशी, अभिषेक कणके, अजय हिराजी मोरे, राम वाघ, ऋषिकेश हटकर, तेजस बागले, राम हटकर, दर्शन गर्दे, हिमेश गर्दे, रुद्रा निकम आणि सनी परदेशी यांनी परिश्रम घेतले. मंदिराचे संस्थापक अध्यक्ष मनोज गर्दे, मुख्य पुजारी दिव्येश जोशी, राजेंद्रसिंग परदेशी, रोहित परदेशी, अनुराग वाघ, मन्साराम परदेशी, प्रकाश झणके, नरेश मोहिते, छोटू सोनार, हरीभाऊ सोनवणे, छोटूभाऊ जाधव, उत्तम बिरारे, राजेंद्र सोनार, सुनील कणके, बापू पाटील, गोरख गर्दे, सुरेश देवरे, हिराजी मोरे, समाधान पाकळे, सिद्धार्थ जोंधळे आदींसह महिला, नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.