धुळे : टुडे पान १ साठी...मेन ( सर्व छायाचित्रे घेणे. )
--
फोटो क्रमांक : 29650
धुळे : जुने धुळे परिसरातील मानाच्या खुनी गणपतीची पालखी खांद्यावर घेवून जाताना भाविक. ( सर्व छायाचित्रे : गोरख गर्दे )
--
फोटो क्रमांक : 29655
धुळे : गणेशोत्सवाच्या उत्साहात पत्नी, लेकींसह बाप्पाला घरी घेऊन जाताना जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद.
--
फोटो क्रमांक : 29657
धुळे : डीजेला फाटा देत पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत गणरायाला नेताना युवती.
--
फोटो क्रमांक : 29659
धुळे : बाजारपेठेत गणेशमूर्ती आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांची झालेली गर्दी. तर याच परिसरातून घरगुती बाप्पाला घेऊन जाताना भाविक.
--
फोटो क्रमांक : 29660
धुळे : शहरातील प्रमुख मार्गांवरुन सार्वजनिक गणेश मंडळांच्या भव्य मूर्तींच्या मिरवणुकीत झालेली गणेशभक्तांची गर्दी.
--
फोटो क्रमांक : 29661
धुळे : मिरवणुकीत सजावट केलेल्या वाहनावरील गणरायासमोर बसलेले बालगोपाळ.
--
ढोल-ताशांच्या निनादात जिल्ह्यात गणरायाचे आगमन
--
डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना पसंती; ८२७ सार्वजनिक व खासगी मंडळांत प्रतिष्ठापना
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...चा जयघोष, ढोल- ताशांचा निनाद, लेझिमचा ठेका, सनई- चौघड्यांचे मंगल सूर आणि गुलालाची उधळण अशा भक्तिमय वातावरणात सोमवारी (ता. १४) विघ्नहर्त्या गणरायाचे शहरासह जिल्ह्यात जल्लोषात आगमन झाले. विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका आणि घरगुती गणपतींच्या प्रतिष्ठापनेमुळे शहराचे वातावरण गणेशमय झाले होते.
-
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा गणेशभक्तांच्या गर्दीने फुलल्या होत्या. जिल्हा रुग्णालयासमोरील साक्री रोड, जिल्हा परिषदेकडे जाणारा मार्ग, जेल रोड, आग्रा रोड, संतोषी माता चौक, फुलवाला चौक, दत्तमंदिर चौक, वाडीभोकर रोड आणि पारोळा रोड चौफुली परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ होती. घरगुती गणपती घेण्यासाठी आणि मूर्तींच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर, पिक-अप वाहने, बग्गी, बैलगाडी व हातगाडीचा वापर करण्यात आला. यंदा गणेश चतुर्थी आणि हरितालिका तृतीया एकाच दिवशी आल्याने महिलांची एकाच वेळी गणरायाच्या स्वागताची तयारी आणि हरितालिकेच्या पूजेची जुळवाजुळव करताना धावपळ उडाली. जुने धुळे परिसरातील मानाच्या खुनी गणपतीची पालखी मिरवणूक सोमवारी पारंपरिक मार्गावरून उत्साहात काढण्यात आली. सनई- चौघड्यांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या गणेशोत्सवाच्या उत्साहात पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह मान्यवरांच्या घरीही वाजत- गाजत गणरायाचे आगमन झाले. कुटुंबीय आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
-
मंडळांमध्ये वाढ
यंदा जिल्ह्यात ८२७ सार्वजनिक आणि खासगी गणेश मंडळांत गणरायाची प्रतिष्ठापना झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९१ मंडळांची वाढ झाली आहे. धुळे शहरात १४४ लहान आणि १०० मोठ्या, अशा २४४ मंडळांत गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
-
पोलिसांचा चोख बंदोबस्त
उत्सव शांततेत, आनंदात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला. शहरासह जिल्ह्यात सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील, आझादनगरचे निरीक्षक विनोद पाटील, देवपूरचे निरीक्षक जिभाऊ पाटील, पश्चिम देवपूरचे सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते आदी अधिकारी बंदोबस्ताची पाहणी करीत होते.
-
१४-१
..चौकट..
१४-१
पारंपरिक वाद्यांना पसंती
यंदाच्या गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कर्णकर्कश डीजेला अनेक मंडळांनी फाटा देत पारंपरिक वाद्यांना दिलेली पसंती ठरली. ध्वनिप्रदूषणाविरोधातील जनजागृतीचा परिणाम म्हणून पारंपरिक वाद्यांकडे झालेला कल प्रकर्षाने जाणवला. ढोल- ताशा, डफ, लेझिम आणि सनई-चौघड्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या.
-