धुळे : टुडे पान १ साठी...
--
फोटो क्रमांक : 29666
बोरकीखडी (ता. साक्री) : बायोडिझेल व केमिकलविरोधात महसूल, पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या कारवाई ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकसह अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर. शेजारी पथकातील अधिकारी, कर्मचारी.
--
बोरकीखडीत पावणेनऊ लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त
--
महसूल, पुरवठा व पोलिसांची संयुक्त कारवाई; दोघांवर गुन्ह्याची प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. १४ : तालुक्यातील बोरकीखडी आणि भोणगाव परिसरात अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेल्या बायोडिझेल व केमिकलविरोधात महसूल, पुरवठा विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत बायोडिझेल, केमिकल व वाहनासह आठ लाख ७७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांवर गुन्ह्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-
बोरकीखडी येथील हॉटेल चांदणीवर संयुक्त पथकाने छापा टाकला. या वेळी तेथे अवैधरित्या साठवून ठेवलेले बायोडिझेल आढळून आले. हॉटेलमालक हुसेन भाई उमर भाई जुने जा (रा. बोरकीखडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तीन लाखांचे किमतीचे बायोडिझेल आणि पाच लाखांचे किमतीचे वाहन असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत भोणगाव येथील गौरी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शिवारात पुरवठा विभागाने छापा टाकला. पाहणीदरम्यान तेथे तीन मोठ्या केमिकलच्या टाक्या आढळून आल्या. या ठिकाणाहून १२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जितेंद्र ठाकूर (वय ४२, रा. धुळे) याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली. पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, मंडळ अधिकारी रोहित झोडगे, प्रवीण पवार, राजाराम पावरा, ग्राम महसूल अधिकारी भारत देसले, साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक वळवी, शांतीलाल पाटील, आनंद चव्हाण, रोहित चित्ते आणि योगेश पिसे सहभागी झाले होते.