फोटो : 29674
नाशिक : आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांच्याशी चर्चा करताना कास्ट्राईबचे जितेंद्र साळुंखे, समीर साळवी, सचिन गडे, धीरज पाटील.
…
विद्यार्थी हिताशी तडजोड नाही
प्रा.अशोक उईके : कास्ट्राईब महासंघासोबत बैठकीत आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१४ : आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षा, कर्मचारी सन्मान, न्याय सेवा अटी आणि विभागातील संरचनात्मक सुधारणा या बाबींना सर्वाधिक प्राधान्य राहिल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या शिष्टमंडळाची काही दिवसांपूर्वी मंत्री अशोक उईके यांच्यासोबत बैठक पार पडली. बैठकीस उपसचिव रवींद्र जाधव, अपर आयुक्त दिनकर पावरा, डिगांबर चव्हाण, ललित वऱ्हाडे ऑनलाइन सहभागी झाले. तसेच महासंघाच्या वतीने जितेंद्र साळुंखे, समीर साळवी, सचिन गडे, धीरज पाटील, राजरत्न पवार, सुवर्णा इंगोले, दीपाली राऊत, पुनम साबळे उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांचे हित, कर्मचारी कल्याण आणि विभागीय प्रशासन यांच्यात समतोल साधणार्या दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता मान्य केली. विभागातील अनेक प्रश्न हे वर्षानुवर्षे प्रलंबित असून त्यांचे संस्थात्मक व धोरणात्मक निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.