मेनफिचर
टुडे पान एकसाठी
-------------
लोगो : जळगाव जिल्हा बँकेची प्रशासकीय इमारत
-----------------
निवडणूक तोंडावर, राजकीय पक्षांचे काही ठरेना!
--
पालकमंत्री-जलसंपदामंत्री घेणार निर्णय; महायुती की, स्वतंत्र्य लढण्याबाबत उत्सुकता
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या निवडणुकीबाबत अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. ही निवडणूक महायुती म्हणून भाजप-शिवसेना लढवेल की, स्वतंत्र पॅनलद्वारे? याकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष आहे.
महाविकास आघाडीचेही ठरेना
काँग्रेसची मागील पंचवार्षिक निवडणुकीत ताकद वाढली होती. गेल्या २०२१मध्ये ‘मविआ’च्या सहकार पॅनेलमध्ये काँग्रेसलाही फायदा झाला. काँग्रेसच्या चारपैकी तीन उमेदवार विजयी झालेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व वाढल्याचा दावा त्यावेळी पक्षाकडून करण्यात आला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्यासह महाविकास आघाडीच्या बँकेच्या निवडणुकीबाबत काही जागांबाबत बैठका झाल्या. मात्र, त्यातून अजून नेमक्या किती जागा कोणाला द्यावयाच्या? याबाबत धोरण निश्चित झाले नाही. स्वतंत्र लढायचे की, महाविकास आघाडीतर्फे याबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय होणार असल्याचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी सांगत आहेत.
---------
कोट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत अजून काँग्रेसच्या नेत्यांकडून मार्गदर्शन आलेले नाही. त्यांनी आदेश दिला की, त्याप्रमाणे करू. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या
काँग्रेस पक्षाच्या शिबिरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सर्व निवडणूका लढवा, असा संदेश दिला होता. आता काँग्रेसच्या वरिष्ठस्तरावरून जिल्हा बँकेबाबत निर्णयाची वाट पाहत आहोत.
- ॲड. अविनाश भालेराव, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
-----
कोट
राज्यात महायुतीचे(भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) सरकार आहे. जिल्हा बँक निवडणूक लढविण्याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार अनिल पाटील हे निर्णय घेतील. या निवडणुकीबाबत लवकरच रणनिती तयार केली जाणार आहे.
- संजय पवार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
------
कोट
जिल्हा बँक लढविताना समविचारी राजकीय नेत्यांची मोट बांधून निवडणूक लढविली जाईल. महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्याबाबत प्रदेशस्तरावरून काय आदेश येतो? याची वाट पाहत आहोत. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
- प्रमोद पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष.
--------
चौकट
भाजपकडून सर्वसामान्य
कार्यकर्त्यांना संधी केव्हा?
जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०पैकी ११ संचालक गैरहजर होते. त्यात राजकीय नेते व मंत्री असून, त्यांना सर्वच बैठकांना हजर राहण्यास वेळ मिळतोच, असे नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांनी सर्व पदे आपल्या व कुटुंबाकडे न ठेवता बँकेच्या संचालकपदी सर्वसामान्य अभ्यासू कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी भाजपच्या सहकार क्षेत्रातील इच्छूक कार्यकर्त्यांनी केली आहे.