नखाने कागदावर साकारले गणराय

नखाने कागदावर साकारले गणराय
Published on
NSK26H29707 नंदुरबार : कलाशिक्षक ज्ञानेश्‍वर सोनवणे यांनी नखाद्वारे कागदावर साकारलेले गणराय. -------------------- नखाने कागदावर साकारले गणराय नंदुरबारमधील कलाशिक्षकाचा आविष्कार सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : येथील कलाशिक्षकाने केवळ नखांच्या साहाय्याने कागदावर गणरायाची आकर्षक कलाकृती साकारली असून, या कलाकृतीसाठी पेन, पेन्सिल, रंग, शाई किंवा कोणत्याही रासायनिक अथवा यांत्रिक साधनांचा वापर करण्यात आलेला नाही. गणेशोत्सवानिमित्त अंगठा व मधल्या बोटाच्या नखांनी कागदावर सूक्ष्म उठाव निर्माण करून साकारलेल्या विविध कलाकृती म्हणजे साकारलेली अक्षरे व चित्रे डोळ्यांनी पाहण्यासोबतच स्पर्शातूनही जाणवतात. गेल्या २७ वर्षांपासून ‘स्पर्शाक्षर नखलेखन’ या अभिनव कलेचा सराव करणारे कलाशिक्षक व नखलेखन कलाकार ज्ञानेश्वर भीमराव सोनवणे यांनी आतापर्यंत भगवद्गीतेचे १८ अध्याय व ७०० श्लोक अशा प्रकारे नखलेखनातून साकारले आहेत. तसेच, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ‘सागरा प्राण तळमळला’ हे गीतही त्यांनी नखलेखनातून साकारले आहे. ‘भारत संतवाणी’ या संकल्पनेतून विविध संतांच्या रचनांनाही त्यांनी आपल्या अनोख्या कलेतून आकार दिला आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत बसवेश्‍वर, संत गुरु नानक देवजी, संत कबीर, संत सेना महाराज, संत नरसी मेहता, संत मीराबाई यांच्या रचनांचा त्यांच्या या कलाप्रवासात समावेश आहे. याशिवाय पसायदान आणि ‘वंदे मातरम्’ यासारख्या महत्त्वपूर्ण कलाकृतीही त्यांनी नखांच्या सहाय्याने कागदावर साकारल्या आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद नखचित्राच्या माध्यमातून त्यांनी शंभरहून अधिक विविध मान्यवरांची व्यक्तिचित्रेही साकारली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, अमिताभ बच्चन यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची व्यक्तिचित्रे त्यांच्या चित्रांचा यात समावेश आहे. जखाणे (ता. शिंदखेडा) येथील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ते कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या भगवद्गीतेच्या नखलेखन कलाकृतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com