सेकंडमेन
टुडे पान एकसाठी
(खालील एआय फोटो मजकुरात वापरावा)
NSK26H29696
------------------
NSK26H29697
ओळ : कविता मिस्तरी
-------------
(फोटो येणार आहे)
ओळ : अटकेतील संशयित
----------
संशयिताला पाच दिवस पोलिस कोठडी
---
कविता मिस्तरी खून प्रकरण; कपड्यांवरून पटली मृतदेहाची ओळख
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१५ : शहरातील रामेश्वर कॉलनीमधील रेणुकानगरातील कविता अरुण मिस्तरी (वय ३८) या महिलेच्या खूनप्रकरणी संशयित नरेश ऊर्फ आबा सुरेश सोनवणे (वय ३४) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मंगळवारी (ता.१५) त्याला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सोयरिक संबंधाला विरोध
कविताचे वैवाहिक संबध ताणले जाऊन मुलगा व मुलीसह त्या काही वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत होत्या. प्लंबिंगचे काम करणारा अविवाहित नरेशशी तिची ओळखी झाली. त्यानंतर दोघे चार वर्षे एकत्र राहत होते. मात्र, नरेशच्या आई व बहिणीने त्याच्यासाठी मुलीचा शोध सुरू केल्याने त्यांच्या संबंधात वादाची ठिणगी पडली.
घटनेच्या आदल्या दिवशी वाद
अटकेतील नरेशने खुनाची कबुली दिली पोलिसांसमक्ष दिली. कविता व मी चार वर्षे एकत्र राहत होतो. मात्र, माझ्या आई व बहिणीने माझ्यासाठी मुलगी पाहण्यास सुरवात केल्याने कविता तीन-चार मैत्रिणी घेऊन माझ्या घरी आली. वृद्ध आईला शिवीगाळ करून दम दिला. आईने प्रतित्तर दिल्याने तिने आईला मारहाण करीत पोरगी पाहिली तुला व तुझ्या मुलाला पाहुन घेईल, अशी धमकी दिली. म्हणून मला राग आल्याचे नरेशने प्राथमिक चौकशीत सांगितले.
असा झाला उलगडा
वादानंतर नरेश दुसऱ्याच दिवशी कविसाच्या घरी गेला व दवाखान्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवरून पद्मालयला नेले. तेथून कविताने मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करून आम्ही पद्मालयला आल्याचे सांगितले हेाते. त्यानंतर दोघांचा मोबाईल बंद झाल्याने संशय बळावला. तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक अशोक काळे, नरेंद्र मोरे व गुन्हेशोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याने कविता नरेश सोबत जात असल्याचे आढळून आले. सहा दिवसांनी पद्मालयाच्या जंगलात अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला. कविताचा मुलगा व बहिणीने अंगावरील कपडे, हातावरील टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी नायरा पेट्रोल पंपावरुन नरेशला ताब्यात घेतले.
न्यायालयात केले हजर
दरम्यान, तपासाधिकारी अशोक काळे यांनी नरेशला मंगळवारी न्यायालयात हजर केले. गुन्ह्यातील कारणे, खून कसा केला, त्यावेळी कोणी सोबत होते का, कुणी साथ दिली? संशयित व मृत या दोघांच्या बेपत्ता मोबाईलचा शोध घ्यायचा असल्याने सरकार पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत पाठवले.