जिल्‍हा परिषद बैठक

जिल्‍हा परिषद बैठक
Published on
ॲंकर टुडे पान एकसाठी ------- NSK26H29704 जळगाव : जिल्हा परिषदेत मंगळवारी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत झालेल्या आढावा बैठकीत सहभागी राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान, मुख्‍य कार्यकारी अधिकारी करिश्‍मा नायर आदी. -------- सफाई कर्मचाऱ्यांना हक्काचे लाभ वेळेत मिळावेत ------- आयोगाचे उपाध्यक्ष सारवान : प्रलंबित प्रश्नांवर जिल्हा परिषदेत आढावा बैठक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित प्रकरणांवर नियमोचित व तातडीने कार्यवाही करावी. सोबतच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ वेळेत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिले. श्री. सारवान मंगळवारी (ता.१५) जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यात त्‍यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या सुचना दिल्‍या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत बोढरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेश सोनवणे, जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती, वर्ग-४ मधून वर्ग-३मध्ये पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी, वारसा हक्काने नियुक्ती व इतर विविध सेवाविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करीत सफाई कामगारांचे लाभ लवकर देण्याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले. ------ इन्‍फो समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : सीईओ सफाई कर्मचारी हे ग्रामीण भागातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. शिवाय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करून आवश्यक त्या बाबींचा कृतिआराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी या बैठकीत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com