कारवाईचा धुळ्यात निषेध

कारवाईचा धुळ्यात निषेध
Published on
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 29712 अंचाडे (ता. धुळे) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षकांवरील कारवाईच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन करताना समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक. शेजारी प्रवीण पाटील, अरुणा पवार. -- काळ्या फिती लावून प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन -- गंगापूर- खुलताबादच्या शिक्षकांवरील कारवाईचा धुळ्यात निषेध सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील एक हजार ८६ प्राथमिक शिक्षकांची एक वेतनवाढ तीन वर्षांसाठी बंद करण्याच्या दंडात्मक कारवाईविरोधात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी मंगळवारी (ता. १५) काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. शिक्षकांवर झालेली ही सामूहिक कारवाई अन्यायकारक असून, यामुळे शिक्षकांच्या आर्थिक हितासोबतच त्यांच्या मनोबलावरही मोठा परिणाम होत असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी काळ्या फिती लावून आपले दैनंदिन कामकाज केले. आज गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांवर ही कारवाई झाली आहे, उद्या अशी वेळ कोणत्याही जिल्ह्यातील शिक्षकांवर येऊ शकते. त्यामुळे अन्यायाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी एकजुटीने उभे राहणे गरजेचे आहे, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. ही कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी आणि संबंधित एक हजार ८६ शिक्षकांना न्याय दिला जावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, भविष्यात शिक्षकांवर अशा प्रकारची सामूहिक व कठोर कारवाई होणार नाही, याची शासनाने दक्षता घ्यावी, असेही बजावण्यात आले. सदर आंदोलनाची हाक प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली होती. या आंदोलनात समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, संजय शिंदे, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, शिवानंद बैसाने, विजय खैरनार, विनोद पाटील, रवींद्र बोरसे, बापू पारधी, भूपेश वाघ, मुरलीधर शिंदे, राजेंद्र भामरे, ज्ञानेश्वर पवार, जगदीश बडगुजर, नाझीम मिर्झा, विश्वनाथ सोमवंशी, ज्ञानेश्वर कणखर, वंदना सावंत, सुरेखा बोरसे, तृप्ती राजूरकर, प्रतिभा वाघ, ज्योत्स्ना सनेर, चेतना परदेशी, रुपाली सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com