आदिवासी आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटणार

आदिवासी आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटणार
Published on
पान-३ मुख्य --------- फोटो : 29709 नाशिक ः आमदार राजेश पाडवी यांना निवेदन देताना सोनू गायकवाड, प्रशांत गावंडे, लक्ष्मी जाधव, राहुल पावरा आदी. ------------------- आदिवासी आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटणार आमदार राजेश पाडवी यांची मध्यस्थी; ‘लाँग मार्च’पूर्वी बैठक घेण्याचे आश्‍वासन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : आदिवासी वसतिगृहातील असुविधांसाठी जबाबदार आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांच्या राजीनाम्यासाठी आदिवासी बांधव येत्या २८ सप्टेंबरला नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढणार आहेत. तत्पूर्वी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार राजेश पाडवी यांनी मंगळवारी (ता. १५) आंदोलकांची भेट घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडविण्याचे आश्‍वासन दिले. --------------- गडचिरोली जिल्ह्यात तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. वसतिगृहातील असुविधा, खासगी शिक्षण संस्थांकडून आकारले जाणारे डोनेशन, शाळांना खर्च मंजुरीचा अधिकार, या विभागाचे सचिव विजय वाघमारे व आयुक्त लीना बनसोड यांची बदली करावी आदी मागण्यांसाठी आदिवासी युवकांचे महिन्याभरापासून नाशिकच्या ईदगाह मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. आमदार पाडवी यांनी मंगळवारी आंदोलकांची भेट घेतली. सरकार आपल्या मागण्यांविषयी सकारात्मक असून, ‘लाँग मार्च’ काढण्याची आंदोलकांना वेळ येणार नाही. मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ घेऊन आंदोलकांची बैठक घेण्याचे आश्‍वासन आमदार पाडवी यांनी दिले. साधारणत: २६, २७ सप्टेंबरला ही बैठक होण्याची शक्यता वर्तविली जाते. आंदोलक राहुल पावरा, प्रशांत गावंडे, सागर पावरा, ललितकुमार चौधरी, लक्ष्मी जाधव, सोनू गायकवाड, प्रभाकर फसाळे आदी उपस्थित होते. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com