धुळे टुडे १ साठी...
---
फोटो- NSK26H29716
धुळे : पांझरा नदीकाठी कृत्रिम तलावात दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना भाविक. सोबत मनपाचे कर्मचारी.
---
दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन
---
मनपाकडून पांझरा नदीकाठावर सुविधा; आयुक्तांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी पांझरा नदीकाठी ठिकठिकाणी अकरा ठिकाणी व्यवस्था केली आहे. या ठिकाणी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे भाविकांनी मनोभावे विसर्जन केले. दरम्यान, विविध दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेची महापालिका आयुक्तांनी मंगळवारी (ता. १५) पाहणी केली.
अत्यंत उत्साहात सोमवारी (ता. १४) श्री गणरायाचे आगमन झाले. सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती स्वरुपात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. दरम्यान, आता मंगळवारी (ता. १५) दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे भाविकांकडून विसर्जन करण्यात आले. पांझरा नदीकाठी महापालिकेतर्फे ठेवलेल्या कृत्रिम तलावात (पाण्याच्या टाक्या) भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्या. मनपा कर्मचाऱ्यांनी मूर्त्या व निर्माल्य संकलित केले. दरम्यान, पांझरा काठी केलेल्या मूर्ती विसर्जन व्यवस्थेची महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाहणी केली. उपायुक्त हेमंत निकम, शहर अभियंता चंद्रकांत उगले व इतर अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता, संकलन व्यवस्था आणि भाविकांच्या सुविधांबाबत आवश्यक आयुक्त कापडणीस यांनी दिल्या. मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, महेंद्र ठाकरे, प्रमोद चव्हाण, राकेश गर्दे, मुकादम जयकिशन पिवाल, चेतन सोनकांबळे, मिलिंद शिरसाट, विजय लहामगे, योगेश जिरे आणि सफर बेग यांच्यासह स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात नदीपात्राचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी गणेमूर्ती विसर्जन व निर्माल्यदानासाठी केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
---