मोफत पशुधन लसीकरण

मोफत पशुधन लसीकरण
Published on
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 29717 धुळे : माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा सप्ताहाअंतर्गत बाजार समिती आवारात पशुधनास लस देताना पशुवैद्यकीय पथक. शेजारी योगेश पाटील, गुणवंत देवरे, संभाजी राजपूत, रावसाहेब पाटील आदींसह पदाधिकारी. -- सेवा सप्ताह अंतर्गत मोफत पशुधन लसीकरण -- कुणाल पाटीलांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; शेतकऱ्यांचा प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत धुळे बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्यात पशुधनात बळावणाऱ्या साथीच्या रोगांना अटकाव करणाऱ्या या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी आमदार पाटील यांनी नेहमीच शेतकरी, शेती आणि सिंचनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असलेल्या पशुधनाचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. बाजार समितीचे सभापती योगेश पाटील आणि संचालक मंडळाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सभापती पाटील यांनी कुणाल पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्याच प्रेरणेने आज आपण सेवा सप्ताह साजरा करत असून, पशुधन लसीकरणामुळे पावसाळ्यातील संभाव्य आजारांपासून जनावरांचे रक्षण होईल आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल, असा विश्वास सभापती पाटील यांनी व्यक्त केला. - या शिबिरात बैल, गाय, म्हैस, शेळी आणि मेंढ्या यांसारख्या विविध जनावरांवर मोफत लसीकरण करण्यात आले. पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्यामुळे शेकडो पशुधनावर वेळेवर उपचार व लसीकरण करणे शक्य झाले. बाजार समितीचे सभापती पाटील, ज्येष्ठ नेते गुणवंत देवरे, उपसभापती संभाजी राजपूत, संचालक रावसाहेब पाटील, ऋषीकेश ठाकरे, विश्‍वास शिंदे, वंजी भिल, माजी सरपंच सोमनाथ पाटील, माजी उपसरपंच हिरामण पाटील, भाजपचे सरचिटणीस कमलेश भामरे, सचिव देवेंद्र पाटील, सहायक संचालक विशाल आव्हाड, देवेंद्रसिंग सिसोदिया, सहायक आयुक्त (पशुधन) डॉ. मनोज पाटील, पशुधन अधिकारी डॉ. प्रशांत निकम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com