धुळे : टुडे पान २ साठी... अवतीभवती
--
फोटो क्रमांक : 29719
धुळे : शिवसेना कार्यालयात श्री गणेशाच्या स्थापनेवेळी उपस्थित संजय वाल्हे, संजय कुसळकर, दिगंबर चौधरी आदींसह पदाधिकारी.
-
शिवसेना कार्यालयात
श्री गणेशाची स्थापना
धुळे : शिवतीर्थ परिसरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात विघ्नहर्ते श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा भक्तीमय वातावरणात झाली. या मंगल प्रसंगी शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे, ओबीसी सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर, उपमहानगरप्रमुख दिगंबर चौधरी, विभागप्रमुख आबा सैंदाणे, पराग आहिरे, बबलू शेख, किरण आगलावे, सतिष काळे, देवेंद्र गायकवाड, सिद्धार्थ करंनकाळ, योगेश वणी, आनंद सोनवणे, हेमंत घटी, सागर, अस्लम खाटीक, कलीम शेख, निकम, अजय जगदाळे, शुभम जगदाळे आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : 29720
धुळे : पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेल्या भगवा चौक गणेश मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी पदाधिकारी.
-
पारंपरिक वाद्यात
गणरायचे स्वागत
धुळे : शहरातील गणेशोत्सवाची परंपरा आणि उत्साहाची साक्ष देणाऱ्या भगवा चौक गणेश मंडळाच्या गणरायाचे यंदा जल्लोषात आणि वाजत- गाजत स्वागत करण्यात आले. ढोल- ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या १२ पावली नृत्यामुळे परिसर भक्तिमय झाला. महाराणा प्रताप पुतळा येथून निघालेल्या या मिरवणुकीत गणेशभक्तांनी सहभाग घेतला. भगवा चौक येथे आल्यावर बाप्पाच्या जयघोषात गणरायाचे स्वागत झाले. मंडळाचे यंदाचे २४ वे वर्ष असून, स्वागत व धार्मिक उपक्रमांसोबतच ज्वलंत सामाजिक विषयावर समाजप्रबोधनपर देखावा सादर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. भक्ती, संस्कृती व समाजप्रबोधनाचा संगम साधत हा उत्सव साजरा करण्याचा संकल्प आयोजक पंकज गोरे यांनी केला आहे. गुलाब गोरे, माजी नगरसेवक नंदकुमार गोरे, प्रवीण मुर्तडकर, विनोद रनमळे, आप्पा लहामगे, विजय गोरे, मनोज गवळी, मंगेश पिंगळे, बिल्लू शर्मा, बाळू पेढवाल, राजेंद्र ठक्कर, बाळू पाटील, गुलाब येलमामे, योगेश गोरे, भटू नवाळे, देविदास पाटील, पंकज भारस्कर, सागर साळवे, जयवंत गोरे, धनंजय दीक्षित, ज्ञानेश्वर देवरे, श्याम गुप्ता, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.
--
शिवनेरी चौकात
बाप्पाचे आगमन
धुळे : शिवनेरी चौक गणेश मित्रमंडळाच्या वतीने लाडक्या गणरायाचे वाजत-गाजत जल्लोषात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर भक्तीमय झाला होता. या आगमन सोहळ्याला संस्थापक अध्यक्ष कुणाल कानकाटे आणि अध्यक्ष शुभम कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. रामदास कानकाटे, कैलास मराठे, ईश्वर चौधरी, चंद्रशेखर कानकाटे, सोनू कानकाटे, सतीश पाटील, मोहन महाले, हरीकांत वाघ, भतू शेटे, उज्ज्वल कोठावदे, कपिल कुटे, ओम् कानकाटे, हर्षल साळुंखे, अमोल शिंदे, सोमेश कानकाटे, नयनेश ठाकूर, गोपी चव्हाण, बाबा नाईक, संकेत कोठावडे, सागर भडांगे, रितेश कांकरिया, मंदार मिस्तरी, वैभव वाघ, यश चौधरी, चेतन भडांगे आदी उपस्थित होते. श्रींच्या आगमनानंतर आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवात पुढील दहा दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
--