फोटो : H29726
आडगाव : ‘साइनोफेस्ट-२०२६’ राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, डॉ. रेणुका ब्राडू, डॉ. नारायण जयशंकर, डॉ. मंगेश जाधव आदी.
मविप्रच्या रुग्णालयात
‘साइनोफेस्ट’ कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : मविप्र संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि संशोधन केंद्रात ‘साइनोफेस्ट २०२६’ राष्ट्रीय कार्यशाळा झाली. या तीन दिवसीय कार्यशाळेत देशभरातील दीडशेहून अधिक कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यावेळी आठ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियादेखील केल्या.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी लाइव्ह कॅडॅव्हेरिक सायनस डिसेक्शनचे प्रात्यक्षिक घेतले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी लाइव्ह सायनस शस्त्रक्रिया केल्या. सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यशाळेचे मुख्य ऑपरेटिंग सर्जन मुंबईच्या डॉ. रेणुका ब्राडू व डॉ. नारायण जयशंकर होते. तसेच नाशिकचे डॉ. पुष्कर लेले व डॉ. महेश निकम यांनीदेखील शस्त्रक्रिया केल्या. कार्यक्रमाचे आयोजन ईएनटी विभागप्रमुख डॉ. श्रीया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आयोजक सचिव डॉ. रुषिका पटेल, डॉ. महेश निकम यांनी समन्वय साधून कार्यक्रम सुरळीत पार पाडला. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांचे सहकार्य लाभले.