उपाययोजनांच्या नावाने बोंब

उपाययोजनांच्या नावाने बोंब
Published on
धुळे टुडे १ साठी मेन... --- कृपया, फोटो लोगो म्हणून वापरावेत... --- फोटो- NSK26H29733, NSK26H29734 धुळे : मागील महिन्यात धुरळणी, फवारणीसाठी खरेदी केलेल्या नवीन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. प्रत्यक्षात ते मनुष्यबळाअभावी धुळखात उभे आहेत. --- नुसताच गाजावाजा; प्रत्यक्षात उपाययोजना ठप्प! --- मनुष्यबळाअभावी नवीन वाहने धुळखात; डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : डासांची उत्पत्ती वाढून साथजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन डासाच्या प्रतिबंधासाठी नव्याने घेतलेल्या धुरळणी मशिन्स वाहनांचे लोकार्पण मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र, या वाहनांवर चालकच नसल्याने ते लोकार्पणानंतर बंदच आहेत. दुसरीकडे मनुष्यबळाअभावी इतरही उपाययोजना निम्म्यावर आल्या आहेत. त्यामुळे विविध प्रभागांमध्ये उपाययोजनांच्या नावाने बोंब आहे. दुसरीकडे डेंगीसह इतर साथरोग वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. ---------- पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंगी, मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढतो. सद्यस्थितीत शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे. काही नगरसेवकासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही डासांचा प्रादुर्भाव व रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी होत आहेत. महापालिकेकडून मात्र उपाययोजनांच्या नावाने सध्या तरी बोंब असल्याचे दिसते. नुसता गाजावाजा मागील महिन्यात शहरातील विविध भागांमध्ये धुरळणी करण्यासाठी तीन नवीन आणि मनपाकडे उपलब्ध असलेली एक अशा एकूण चार ॲपे रिक्षांचा वापर करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले. फॉगर मशिन्स बसविलेल्या नवीन वाहनांचे अधिकारी- पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पणही करण्यात आले. त्याचवेळी प्रत्येक प्रभाग कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आणि स्वच्छता निरीक्षकांच्या अधिपत्याखाली एका सत्रात साधारणपणे २० ते ३० किलोमीटर परिसरात धुरळणी करण्याचे तसेच नव्याने उपलब्ध असलेल्या एकूण सहा मिनी ट्रॅक्टर, स्प्रेइंग ब्लोअर आणि जेट मशिनच्या सहाय्याने विविध ठिकाणी फवारणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचा मोठा गाजावाजाही करण्यात आला. प्रत्यक्षात वाहने बंदच दरम्यान, या नवीन वाहनांवर चालकच नसल्याने ही सर्व वाहने आजघडीला बंद आहेत. त्यामुळे उपाययोजनाही थांबल्या आहेत. याबाबत मागील स्थायी समिती सभांमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. नवीन वाहने, मशिन्स सुरू झाल्याचे जाहीर केले ते कुठे आहेत असे प्रश्न नागरिक विचारतात असेही या सदस्यांनी सांगितले. स्थायी समितीत कंत्राची पद्धतीने मनुष्यबळ घेण्याचा विषयच तहकुब झाल्याने मनुष्यबळ उपलब्ध झालेले नसल्याचे अधिकारी म्हणतात. दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे व रुग्णही आढळत असल्याच्या तक्रारी आहेत. निम्मे मशिन्स बंद आजघडीला चारपैकी दोन फॉगिंग, दोन फवारणी मशिन्स सुरू आहेत. तीच स्थिती हँडपंपांचीदेखील आहे. फवारणीचे चारपैकी दोनच ट्रॅक्टर सुरू आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत यापूर्वी सुरू असलेल्या उपाययोजनादेखील निम्म्यावर आल्याचे हे चित्र आहे. महापालिकेच्या मलेरिया विभागाकडे सध्या ४५ कर्मचारी आहेत. हे कर्मचारी उपलब्ध मशिन्सद्वारे फवारणी, धुरळणीसह ॲबेटींग, गप्पी मासे सोडणे, डबक्यांमध्ये ऑइल टाकणे आदी कामे करत आहेत. दरम्यान, महापालिका क्षेत्रात सध्या डेंगी, मलेरिया रुग्णांची, संशयित रुग्णांची काय स्थिती आहे याबाबत महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून आकडेवारीही उपलब्ध होवू शकली नाही. ---
Marathi News Esakal
www.esakal.com