बाजार समितीत सीसीटीव्ही

बाजार समितीत सीसीटीव्ही
Published on
धुळे टुडे १ साठी अँकर... --- फोटो- NSK26H29736 धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीत बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन करतांना पोलिस निरीक्षक विनोद पाटील. सोबत सभापती योगेश पाटील व इतर मान्यवर, शेतकरी. --- बाजार समितीत आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ‘वॉच’ --- मान्यवरांच्या उपस्थितीत यंत्रणेचे लोकार्पण; शेतमालाच्या सुरक्षेसाठी मदत सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : बाजार समिती आवारात शेतकऱ्यांचा शेतमाल चोरीला जाऊ नये, भुरट्या चोरांना आळा बसावा व बाजार समिती आवारातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने संपूर्ण आवारात एकूण ६० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आझाद नगरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या हस्ते या यंत्रणेचे उद्‌घाटन तथा लोकार्पण करण्यात आले. --- धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताहअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती सभापती योगेश पाटील यांनी दिली. बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक- जावक आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अशा गजबजलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अथवा लिलावाच्या गर्दीत शेतमाल चोरीला जाण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी बाजार समिती प्रशासनाने संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणण्याचा निर्णय घेतला. पोलिस निरीक्षक पाटील म्हणाले, बाजार समितीने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून, यामुळे संशयित हालचालींवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य होईल. गुन्हेगारांवर यामुळे वचक बसेल आणि गैरप्रकारांना आळा बसेल. सभापती पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचा माल सुरक्षित ठेवणे ही बाजार समितीची प्राथमिक जबाबदारी आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे संपूर्ण आवार डिजिटल सुरक्षेच्या छत्राखाली आले असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही भितीविना आपला माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन केले. या वेळी उपसभापती संभाजी राजपूत, संचालक यशवंतराव खैरनार, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, संचालक रावसाहेब पाटील, विश्‍वास शिंदे, प्रकाश पाटील, खरेदी- विक्रीचे संचालक दिलीपसिंग गिरासे, माजी सरपंच सोमनाथ पाटील, माजी उपसरपंच हिरामण पाटील, कमलाकर गर्दे, शांताराम पाटील यांच्यासह बाजार समितीचे सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. ---
Marathi News Esakal
www.esakal.com