अभियांत्रिकीला राज्‍यात १ लाख ८१ हजार ९२७ प्रवेश

अभियांत्रिकीला राज्‍यात १ लाख ८१ हजार ९२७ प्रवेश
Published on
मुख्य पन-३ साठी ------------- अभियांत्रिकीलाच यंदा सर्वाधिक पसंती राज्‍यात एक लाख ८१ हजार ९२७ प्रवेश; गतवर्षीपेक्षा १५ हजार १८१ ची वाढ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ ः राज्यातील ३८७ अभियांत्रिकी महाविद्यालयांतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास एकूण दोन लाख २१ हजार ६४६ जागा उपलब्‍ध होत्‍या. यापैकी एक लाख ८१ हजार ९२७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. गेल्‍या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्‍या तुलनेत १५ हजार १८१ जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्यात या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी दोन लाख ५१ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यात १११ अभ्यासक्रमांच्‍या दोन लाख २१ हजार ६४६ जागा उपलब्ध होत्‍या. यापैकी केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेमध्ये दोन लाख तीन हजार २९३ जागा उपलब्ध होत्या. संस्थात्मक फेरीअखेर एक लाख ८१ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या चार फेऱ्या व संस्थात्मक फेरीअखेर शिल्लक राहिलेल्या एकॅपमधील २६ हजार ६८२ व व्यवस्थापन कोट्यातील दोन हजार ३६० अशा एकूण २९ हजार ४२ जागा या वर्षी रिक्त राहिलेल्या आहेत. --- फेरीनिहाय झालेले प्रवेश पहिली फेरी- ३१ हजार ६३२ दुसरी फेरी- ३० हजार ३०४ तिसरी फेरी- २९ हजार ९२९ चौथी फेरी- ४८ हजार ६८९ एकॅप फेरी- २७ हजार ४७२ व्यवस्थापन कोटा- १३ हजार ४७३ जम्मू-काश्मीर व एआयसीटीई कोटा- १८९ ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com