''मुक्त'' अभ्यासक्रमांना प्रवेशास २५ पर्यंत मुदतवाढ

''मुक्त'' अभ्यासक्रमांना प्रवेशास २५ पर्यंत मुदतवाढ
Published on
३६-२ ‘मुक्त’ अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदतवाढ --------- दोन पदव्यांची संधी ः २५ पर्यंत संधी --------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या १३ विविध विद्याशाखांच्या १३३ वेगवेगळ्या पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू आहे. प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून, या अभ्यासक्रमांना विनाविलंब शुल्क येत्या २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील जुलै सत्रासाठी ही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी मिळविता येईल किंवा मुक्त विद्यापीठाच्याच दोन पदव्यांना एकाच वेळी प्रवेश घेता येईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार या वर्षी विद्यापीठात पारंपरिक शिक्षणक्रमांसह नवीन आणि व्यावसायिक शिक्षणक्रम प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या आणि त्यांच्या सवडी व आवडीनुसार शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठ दूरस्थ शिक्षण प्रणालीतून उपलब्ध केली आहे. नोकरी, व्यवसाय करणारे, गृहिणी किंवा ज्यांना नियमित महाविद्यालयात जाणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com