श्री गोवर्धनसिंहजी रघुवंशी सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

श्री गोवर्धनसिंहजी रघुवंशी सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
Published on
फोटो : NSK26H29750 छत्रपती संभाजीनगर : नॅपकॅपचे अध्यक्ष लक्ष्मीकांत दास, फेडरेशनचे अजय ब्रम्हेचा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना गोवर्धनसिंह रघुवंशी, पृथ्वीराज रघुवंशी. शेजारी सुरेश अग्रवाल, रजनीकांत वाणी, जमसिंग गिरासे, अंकलेश शाह, भरत पाटील, राजेंद्र कुलकर्णी आदी. ------------------------ श्री गोवर्धनसिंहजी रघुवंशी सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार नंदुरबार, ता. १६ : येथील श्री गोवर्धनसिंहजी रघुवंशी सहकारी बँकेला सन २०२५- २६ या आर्थिक वर्षासाठी १०० कोटींच्या आत ठेवी असलेल्या बँक गटात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. नॅफकबचे अध्यक्ष लक्ष्मीकांतदास तसेच फेडरेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ सनदी लेखापाल अजयकुमार ब्रम्हेचा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांमधून उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदर्श बँक विषयक आर्थिक निकषांमध्ये ठेवींतील वाढ, कर्जवाटप, गुणवत्तापूर्ण व सर्व आर्थिक व्यवहारांचे मूल्यमापन पूर्ण करणाऱ्या बँकांना हा पुरस्कार देण्यात येतो. सदर पुरस्कार बँकेचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज रघुवंशी, संचालक सुरेश अग्रवाल, रजनीकांत वाणी, जामसिंग गिरासे तसेच बँकेचे जनरल मॅनेजर अंकलेश शाह व असिस्टंट जनरल मॅनेजर भरत पाटील, राजेंद्र कुलकर्णी यांनी स्वीकारला. बँकेने सलग सहाव्यांदा हा पुरस्कार मिळविला असून ग्राहक सेवेत विविध योजना तसेच ग्राहकांना किफायतशीर दराने कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com