स्मार्ट इंडिया हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळाली चालना

स्मार्ट इंडिया हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळाली चालना
Published on
NSK26H29749 जळगाव : ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६’च्या समारोपप्रसंगी विजेत्या संघांना पारितोषिक व प्रमाणपत्रे प्रदान करताना प्राचार्य डॉ. संजय आर. सुगंधी व मान्यवर. ---------------- ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’मध्ये कल्पकतेला मिळाली चालना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : ‘केसीईएस’च्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६’अंतर्गत हॅकाथॉनचा समारोप नुकताच उत्साहात झाला. त्यात महाविद्यालयाच्या विविध विभागांतील २६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आर. सुगंधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यात सामाजिक, तांत्रिक व दैनंदिन जीवनातील विविध समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपाय विद्यार्थ्यांनी सादर केले. या स्पर्धेचे परीक्षण अजिंक्य तोतला, डॉ. के. पी. अकोले, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. नीलेश इंगळे, डॉ. प्रसाद कुलकर्णी व नीलेश महाजन यांनी केले. ....... ऑप्टिमाइंड्स संघ प्रथम ‘ब्लॉकचेन व सायबर सुरक्षा’ या विषयावरील नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी ऑप्टिमाइंड्स संघाने प्रथम क्रमांक मिळविला. या संघात रोहित शिंदे, आचल पाटील, कृतिका पाटील, दिव्या पाटील, वेदांत मोरे व यशराज जाधव यांचा समावेश होता. ....... सिव्हिक कोडर्स द्वितीय ‘स्मार्ट गव्हर्नन्स टेक्नॉलॉजी’ या प्रकल्पासाठी सिव्हिक कोडर्स संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या संघात प्रतिक्षा टी. चौधरी, अंतरा डी. पाटील, रोशनी जी. पाटील, श्रुतिका ए. फाळके, पूजा आर. पाटील व तनुजा डी. पाटील यांचा समावेश होता. ....... दोन संघांना तृतीय बक्षीस ‘वाहतूक व रसद व्यवस्थापन’ या प्रकल्पासाठी कंट्रोल प्लस एन संघाला, तर ‘विविधांगी (मिसलेनियस)’ या प्रकल्पासाठी टेक नोव्हा संघाला तृतीय क्रमांक देण्यात आला. हॅकाथॉन समन्वयक प्रा. शील वाय. बोरोले, सर्व विभागीय समन्वयकांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले. विजेत्या संघांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com