मुख्य स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती लिपिक वाणी यांच्या चौकशीचे आदेश;

मुख्य स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
लिपिक वाणी यांच्या चौकशीचे आदेश;
Published on
महापालिकेतील मुख्य स्वच्छता निरीक्षकाची मूळपदावर गच्छंती -------- सफाई कामगार आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतला आढावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांच्याविरोधात सफाई कामगार संघटनेच्या प्राप्त तक्रारी व हजेरी नोंदवहीतील अनियमिततेची दखल घेत त्यांना मूळ पदावर पाठविण्याचे निर्देश राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी मंगळवारी (ता.१५) दिले. आस्थापना विभागातील लिपिक भीकन वाणी यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेशही महापालिका प्रशासनाला दिले आहेत. सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत श्री. सारवान यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक झाली. यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त आदित्य जिवने, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सारवान यांनी सांगितले की, सफाई कामगारांना सध्या ५० रुपये धुलाई भत्ता दिला जातो. हा भत्ता ५०० रुपये करण्याची शिफारस आयोगाने केली आहे. बीव्हीजी कंपनीने किमान वेतन कायद्यानुसार सफाई कामगारांना वेळेत वेतन देणे बंधनकारक आहे. त्यात कसूर झाल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे अधिकार आयोगाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ....... कांबळेंविरोधात तक्रारी मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांच्याविरोधात सफाई कामगार संघटनेकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. हजेरी नोंदविताना अनियमितता आढळल्याने त्यांना मूळ पदावर पाठविण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आल्याचे सारवान यांनी सांगितले. ....... वाणींच्या कामकाजाची चौकशी आस्थापना विभागातील लिपिक भीकन वाणी यांच्याविरोधातही अनेक तक्रारी प्राप्त असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दरम्यान, किरण मगर या सफाई कामगाराला बेकायदेशीररीत्या बडतर्फ केल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. याप्रकरणी आयोगाने वेळोवेळी सुनावणी घेत बडतर्फीची कारवाई रद्द करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही सारवान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com