शिक्षणाधिकारी दिग्रसकर रजेवर

शिक्षणाधिकारी दिग्रसकर रजेवर
Published on
शिक्षणाधिकाऱ्यांच्या रजेविषयी तर्क-वितर्क --- अचानक रजेवर ः जगताप प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर अचानकपणे रजेवर गेल्याने तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. दरम्यान, त्यांचा पदभार शिक्षणाधिकारी (योजना) सरोज जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला. मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या म्युनिसिपल शाळेचे प्रा. सोपान बोरसे यांचा शाळेत मृत्यू झाला. या प्रकरणी शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याविरोधात मालेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत प्राध्यापकास वेळोवेळी चौकशीस बोलावणे, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे व अपमानित करणे आदी कारणांमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करीत शिक्षक संघटनांनी शनिवारी (ता. १२) शहरात मोर्चा काढला. गुन्हा दाखल झाल्यावर माध्यमिक शिक्षण विभागातील बहुतांश कर्मचारी रजेवर गेल्याने कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. यातच माध्यमिक शिक्षणाधिकारी दिग्रसकर हे रजेवर गेले आहेत. वैयक्तिक कारणामुळे कर्तव्यावर राहणे शक्य होणार नाही व बाहेरगावी जाणार असल्याने खासगी कारणावस्तव अर्जित रजा मिळावी, मुख्यालय सोडण्याची परवानगी द्यावी, अशा स्वरूपाचा अर्ज त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे केला. त्यांची रजा मंजूर करीत तात्पुरता पदभार हा सरोज जगताप यांच्याकडे सोपविण्याचे आदेश ‘सीईओ’ पवार यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com