दिल्ली दरबारी बहुमान

दिल्ली दरबारी बहुमान
Published on
धुळे : टुडे पान १ साठी... -- फोटो क्रमांक : 29756 नवी दिल्ली : हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष कैलास जैन यांना जाहीर व्हिजनरी लीडर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना हस्ती स्कुलच्या संचालक गरिमा जैन. -- कैलास जैन व्हिजनरी लीडर पुरस्काराने सन्मानित -- दोंडाईचाच्या शिक्षण क्षेत्राचा दिल्ली दरबारी बहुमान सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या दोंडाईचा येथील हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष कैलास जैन यांना मानाचा ‘व्हिजनरी लीडर ऑफ द इयर २०२६’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या नेतृत्वाची आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील वेलकम हॉटेल येथे नॅशनल स्कूल अवॉर्ड संस्थेमार्फत नुकताच हा सोहळा पार पडला. लोकसभा सचिवालय उपसंचालक निखिल मिघलाणी आणि एमिटी युनिव्हर्सिटी कोलकाता येथील इंटरनॅशनल रिलेशन ॲन्ड कॉलेबोरेशनच्या प्रमुख शौली मुखर्जी यांच्या हस्ते हस्ती पब्लिक स्कूलच्या संचालक गरिमा जैन यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला. हस्ती ग्रुपच्या माध्यमातून शिक्षणाकडे व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम म्हणून पाहिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, सर्जनशीलता, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि जीवनकौशल्ये रुजावीत यासाठी कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासाला प्राधान्य देत शिक्षकांचे कौशल्यवर्धन आणि पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि हस्ती ग्रुप परिवाराकडून कैलास जैन यांचे कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com