ज्‍येष्‍ठा गौरीचे आज आगमन

ज्‍येष्‍ठा गौरीचे आज आगमन
Published on
टुडे पान ३ : सेकंड मेन NSK26H29767 जळगाव : विक्रीला आलेले महालक्ष्मीचे मुखवटे. ----------- NSK26H29768 महालक्ष्मीची तयार मूर्ती. –––––––– गौराईच्या आगमनासाठी घराघरांत लगबग (उपशीर्षक) ज्येष्ठा-कनिष्ठा महालक्ष्मींचे आज आवाहन; आरास, सजावटची तयारी पूर्णत्वाकडे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर आता घराघरांत ज्येष्ठा-कनिष्ठा महालक्ष्मी अर्थात गौराईच्या स्वागताची लगबग सुरू आहे. तीन दिवस माहेरवाशीण म्हणून घरी येणाऱ्या गौराईचे आगमन उद्या (ता.१७) होत आहे. या अनुषंगाने अनेक घरांमध्ये आरास, सजावट आणि रोषणाईची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. गणेशोत्सवातील गौरी आगमनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गणेश स्‍थापना झाल्‍यानंतर तीन दिवस गौराई माहेराला येत असते. अर्थात चौथ्‍या दिवशी गौराईचे आवाहन असते. त्‍यानुसार उद्या (ता.१७) गौराईला आवाहन करत प्रतिष्‍ठापना केली जाणार आहे. त्यापूर्वी पूजेची तयारी पूर्ण करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. तसेच बाजारात देखील गौराईचे सुरेख असे मुखवट्यांसह लागणारे दागिने, सजावटीचे साहित्‍य विक्रीसाठी दाखल असून आज खरेदी करणार्यांची देखील लगबग पाहावयास मिळाली. ‘आरास’साठी लगबग गौराईच्या आगमनासाठी घरातील जागेची स्वच्छता करून तेथे आकर्षक आरास करण्यात येत आहे. फुले, वस्त्रे, विविध सजावटीच्या वस्तू, पारंपरिक साहित्य यांचा वापर करून गौराईसाठी सजावट केली जात आहे. गणपती प्रतिष्‍ठापना केल्‍याच्‍या बाजूलाच रोषणाईचीही तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे घराघरांत उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. इन्‍फो आज आवाहन, उद्या नैवेद्य गौराईला गुरुवारी आवाहन करत प्रतिष्‍ठापना केली जाते. यासाठी बाजारात गौरीचे मुखवटे, पावले आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्‍यान उद्या (ता.१७) गौरींचे आवाहन व प्रतिष्ठापना करून शुक्रवारी (ता.१८) महालक्ष्मी पूजन आणि षोडशोपचार पूजा केली जाईल. यानंतर महाप्रसादासाठी विविध भाज्या आणि पारंपरिक नैवेद्य दाखविला जाईल. ––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com