पंचवटी कारंजा परिसरात वाहनांना बंदी
नाशिक, ता. १६ : पंचवटी, मालवीय चौक, गजानन चौक आणि कारंजा परिसरात देखावे पाहण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांतर्फे वाहतुकीत २१ ते २४ तारखे दरम्यान सायंकाळी ५ ते मध्यरात्री १२ पर्यंत या भागातील मुख्य मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंद करण्यात आला आहे.
या मार्गांवर प्रवेश बंद:
- दिंडोरी नाका ते पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅन्ड : या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
-मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टँड : या रस्त्यावरून ये-जा करण्यास बंदी असेल.
-आंतरिक चौक व रस्ते : मालवीय चौक ते गजानन चौक, गजानन चौक ते नागचौक, नागचौक ते शिवाजी चौक आणि शिवाजी चौक ते मालवीय चौक या सर्व मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहनांना मनाई असेल.
-काळाराम मंदिर परिसर : सरदार चौक ते श्री काळाराम मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल.
--
पर्यायी मार्ग :
-दिंडोरी नाक्याकडून मालेगाव स्टॅन्डकडे जाणारी वाहतूक : पेठ फाटा - मखमलाबाद नाका - बायजाबाई छावणी - रामवाडी - चोपडा लॉन्स मार्गे पुढे जाईल.
- दिंडोरी नाका - निमाणी काट्या मारुती चौक - संतोष टी पॉइंट मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
-मखमलाबाद नाक्याकडून जाणारी वाहतूक : पेठ नाका मार्गे पुढे.